शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
2
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
3
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
4
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
5
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
6
IND vs SA: रोहित-विराट पुन्हा संघात दिसणार, बुमराह बाहेर जाणार; 'या' खेळाडूचाही पत्ता कट?
7
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
8
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
9
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
10
“बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिले”; शिंदेंनी केले PM मोदी-नितीश कुमारांचे अभिनंदन
11
Metaचे मोठे पाऊल! WhatsApp मध्ये लवकरच येणार 'हे' जबरदस्त फीचर; वारंवार लॉग-इन करण्याची कटकट संपणार
12
मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!
13
...त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कुरुबरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात; काँग्रेसचा टोला
14
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
15
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
16
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
17
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
18
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
19
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
20
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
Daily Top 2Weekly Top 5

एसटीतल्या प्रथमोपचार पेट्यांवरच उपचाराची गरज; एसटीत फर्स्ट एड असणे आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 15:19 IST

आज जागतिक प्रथमोपचार दिन: पेट्यांमधील कीट आता वाहकाकडे

दिगांबर जवादे लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : एसटीत असलेल्या पेटीत ठेवलेली प्रथमोपचाराची किट काही दिवसांतच गायब होत असल्याचा अनुभव लक्षात घेऊन सदर किट वाहकाकडे ठेवण्याचे निर्देश एसटी महामंडळाने दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक वाहकाकडे किट देण्यात आली आहे. मात्र, कर्तव्यावर जातेवेळी बहुतांश वाहक सोबत खरेच किट नेतात काय, हा प्रश्न आहे. अपघातानंतर प्रथमोपचाराचे विशेष महत्त्व असल्याने प्रथमोपचाराचे साहित्य एसटीत असणे आवश्यक आहे.

अपघातात जखमीला दवाखान्यात भरती करण्यापूर्वी जो उपचार केला जातो त्याला प्रथमोपचार असे म्हणतात. उपचाराएवढेच प्रथमोपचाराचेही महत्त्व आहे. रुग्णाला दवाखान्यात भरती करून त्याला उपचार मिळेपर्यंत दिलासा देण्याचे काम प्रथमोपचार करते. प्रत्येक आरोग्याच्या समस्येचे प्रथमोपचार वेगवेगळे आहेत. एसटीने प्रामुख्याने अपघात होण्याची शक्यता असल्याने अपघाताशी संबंधित प्रथमोपचार किट ठेवणे सक्तीचे आहे. 

पेट्या रिकाम्या, वाहकाकडे साहित्य गडचिरोली आगारातील सर्वच बसला प्रथमोपचार पेट्या लावण्यात आल्या आहेत. या पेट्या चालकाच्या केबिनमध्ये लावल्या आहेत. मात्र, पेट्यांमधील प्रथमोपचाराचे साहित्य गायब होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आता प्रथमोपचाराच्या किट वाहकांकडे दिल्या आहेत.

तपासणी पथकाने कीटही तपासावे प्रत्येक विभागात एसटीचे भरारी पथक असते. सदर पथक प्रवाशांनी तिकीट काढले की, नाही, हे तपासत असते. तिकीट आढळून न आल्यास जबाबदार असलेल्या प्रवासी किंवा वाहकावर कारवाई करते. वाहकाने सोबत प्रथमोपचार किट आणली काय? हे तपासावे.

"प्रत्येक आजारानुसार प्रथमोपचार वेगवेगळे आहेत. सर्वसाधारणपणे होणाऱ्या आजाराच्या प्रथमोपचाराची थोडीफार माहिती प्रत्येक व्यक्तीला असावी. जेणेकरून रुग्णाला दवाखान्यात भरती करून त्याच्यावर उपचार सुरू होईपर्यंत त्याला दिलासा मिळेल. अन्यथा प्रकृती अधिक बिघडण्याची शक्यता असते." - डॉ. प्रशांत कारेकर, फिजिशियन

"एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या निर्देशानुसार प्रथमोपचाराची किट वाहकाकडे देण्यात आली आहे. कर्तव्यावर जातेवेळी वाहकाने सोबत प्रथमोपचाराची किट नेणे आवश्यक आहे. साहित्य संपल्यानंतर किवा त्यांची एक्सपायरी संपल्यानंतर विभागीय कार्यालयातून पुन्हा साहित्य उपलब्ध होते."- फाल्गुन राखडे, आगार व्यवस्थापक

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली