राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाणली काेविड सेंटरची माहीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 05:00 AM2021-05-08T05:00:00+5:302021-05-08T05:00:32+5:30

कुरखेडा येथे सुरू होणाऱ्या १५० बेडच्या कोविड केअर सेंटरला  भेट दिली. वैद्यकीय अधीक्षक डाॅ. कमल परसवानी यांच्याकडून  कोविडसंदर्भात माहितीवजा आढावा घेतला. गडचिरोली जिल्ह्यात कोविडचे संक्रमण वाढत असून मृत्यूचे प्रमाणदेखील जास्त आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आदेशावन्ये जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटरची पाहणी केली जात आहे.

NCP office bearers came to know about the Kavid Center | राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाणली काेविड सेंटरची माहीती

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जाणली काेविड सेंटरची माहीती

Next
ठळक मुद्देएकाच दिवशी तीन सेंटरला भेटी, आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे अडचणी मांडणार

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य  रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वात राकाँच्या पदाधिकाऱ्यांनी ५ मे रोजी कुरखेडा, देसाईगंज व आरमाेरी या तीनही  ठिकाणच्या कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील साेयीसुविधा, व्यवस्था व अडीअडचणींची माहिती जाणून घेतली. वैद्यकीय अधीक्षक व आराेग्य कर्मचाऱ्यांशी चर्चा करून या अडचणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मांडणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
कुरखेडा येथे सुरू होणाऱ्या १५० बेडच्या कोविड केअर सेंटरला  भेट दिली. वैद्यकीय अधीक्षक डाॅ. कमल परसवानी यांच्याकडून  कोविडसंदर्भात माहितीवजा आढावा घेतला. गडचिरोली जिल्ह्यात कोविडचे संक्रमण वाढत असून मृत्यूचे प्रमाणदेखील जास्त आहे. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आदेशावन्ये जिल्ह्यातील सर्व कोविड केअर सेंटरची पाहणी केली जात आहे. याशिवाय शासकीय वसतिगृहात असलेल्या तालुक्यातील दोन कोविड सेंटरच्या ठिकाणी भेट देऊन रवींद्र वासेकर यांनी डाॅक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांसाेबत  संवाद साधला व त्यांच्या अडचणी समजून विशेष सहकार्याकरिता राज्यशासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन दिले.    याप्रसंगी राकाँचे जिल्हा सचिव संजय कोचे, युवक सरचिटणीस कुलदीप सोनकुसरे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. कमल परसवानी, डाॅ. जगदीश बोरकर, पुरवठा अधिकारी सुरज ढोणे आदी उपस्थित हाते.
आरमाेरीच्या कोरोना सेंटरमध्ये रुग्णांची विचारपूस करण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉ. कुमारी उईके यांनी अडचणी जाणून घेतल्या. याप्रसंगी तालुका अध्यक्ष संदीप ठाकूर, शहर अध्यक्ष अमीन लालानी हजर होते.
ना. राजेश टाेपे हे राष्ट्रवादीच्या काेट्यातून आराेग्यमंत्री झाले आहेत. आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमार्फत ते विदर्भाच्या जिल्ह्यातील काेविड सेंटरची माहिती जाणून घेत आहेत. त्या अनुषंगाने भेटी दिल्या जात आहेत.

देसाईगंज तालुक्यातही केली पाहणी
देसाईगंज तालुक्यातील कोविड सेंटर भगतसिंग वाॅर्ड व गोकुल नगरातील  कोविड सेंटरला भेट दिली. त्यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बांबोळे यांच्याशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या. तालुक्यात याेग्य उपचाराची सोय नसल्यामुळे किरकाेळ आजारी रुग्णांना गडचिरोलीला पाठवावे लागते. त्यामुळे देसाईगंजच्या रुग्णालयात व काेविड सेंटरमध्ये सर्व  सोयीसुविधा करण्याची गरज आहे. यावेळी कला व सांस्कृतिक विभाग जिल्हा अध्यक्ष भुवन लिल्हारे,  शहर अध्यक्ष लतीफ शेख, सोशल मीडिया विभाग तालुका अध्यक्ष कपिल बोरकर, रायुकाँचे शहर अध्यक्ष दीपक नागदेव, भरत देहलानी उपस्थित होते. दरम्यान यावेळी पदाधिकाऱ्यांनी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांची साेयीसुविधांबाबत विस्तृत चर्चा केली.

 

Web Title: NCP office bearers came to know about the Kavid Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.