शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
3
आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
4
"ताई, तू हे काय केलंय..." निक्की प्रकरणाला नवं वळण; आणखी एक व्हिडिओ व्हायरल, गुंता आणखी वाढला
5
आता ATM आणि UPI द्वारे काढता येणार PF चे पैसे; EPFO 3.0 मध्ये आणखी काय बदलणार?
6
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
7
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
8
"गोविंदा फक्त माझा आहे, आम्हाला कोणीच...", घटस्फोटांच्या चर्चांना सुनीता अहुजाने लावलं पूर्णविराम
9
शाळेची फी भरण्यास उशीर, सहावीच्या विद्यार्थ्याला एका खोलीत नेलं आणि...; शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल
10
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
11
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
12
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
13
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
14
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
15
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
16
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
17
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
18
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
19
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
20
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा

११ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवादी रजनीचे गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण

By संजय तिपाले | Updated: October 7, 2023 15:26 IST

सरपंचाचा खून, चार चकमकींमध्ये सहभाग

गडचिरोली : नक्षल दलममध्ये सदस्य ते एरिया कमिटी मेंबर अशी मजल मारलेल्या छत्तीसगडमधील महिला नक्षलवाद्याने ६ ऑक्टोबरला गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी (२८,रा.ईरूपगट्टा ता.भोपालपट्टनम जि.बिजापूर, छत्तीसगड) असे तिचे नाव आहे. सरपंचाच्या खुनासह पोलिसांसोबतच्या चार चकमकींमध्ये सहभागी असलेल्या रजनीवर ११ लाखांचे बक्षीस होते.

रजनी वेलादी ही ऑगस्ट २००९ मध्ये फरसेगड दलममध्ये सदस्य म्हणून नक्षली चळवळीत सामील झाली. २०१० पर्यंत ती सक्रिय होती. २०१० मध्ये ओरच्छा दलममध्ये बदली होऊन २०१३ पर्यंत ती  कार्यरत राहिली. २०१३ मध्ये नॅशनल पार्क एरिया डॉक्टर टीममध्ये बदली होऊन तिची एरिया कमिटी मेंबर म्हणून पदोन्नती झाली. २०१५ पर्यंत ती कार्यरत होती. त्यानंतर तिची सांड्रा दलममध्ये बदली झाली व तेव्हापासून ती या दलममध्येच कार्यरत आहे.

२०२०- २१ मध्ये उपराल (छत्तीसगड) येथील एका निरपराध सरपंचाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. याशिवाय २०१५ मध्ये गुंडम येथील पोलिस चकमकीत ती सहभागी होती. २०१७ मध्ये बेज्जी- येर्रागुफा मार्गावरीील चकमकीत छत्तीसगडचे १२ जवान शहीद झाले होते. यात देखील ती सहभागी होती. २०१८ मध्ये मारेवाडा व २०१९ मध्ये बोरामज्जी जंगलातील चकमकीतही रजनी वेलादीचा सहभाग होता.२०१८ मध्ये बेद्रे रोडवर शासकीय वाहन पेटवून दिले होते, यामध्येही ती सामील होती. दरम्यान, तिच्यावर छत्तीसगड सरकारने ६ तर महाराष्ट्र शासनाने ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी ७ ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी अपर अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता, यतीश देशमुख उपस्थित होते. यावेळी आत्मसमर्पण करुन सामान्य जीवन जगण्याचा निर्णय घेतल्याबद्दल रजनी वेलादीचा सत्कार करण्यात आला.

साडेचार लाखांचे बक्षीस, भूखंडही मिळणार

दरम्यान, नक्षल्यांसाठी २०१४ मध्ये महाराष्ट्र शासनाने आत्मसमर्पण योजना लागू केली. यांतर्गत रजनी वेलादीला पुनर्वसनाकरता केंद्र व राज्य सरकारकडून एकूण साडेचार लाख रुपये दिले जाणार आहेत. याशिवाय नवेगाव परिसरात भूखंड दिला जाणार असून रोजगार देखील मिळवून दिला जाणार आहे.

आतापर्यंत १३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

जिल्ह्यात मागील पावणे दोन वर्षांत १३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली. नक्षल चळवळ खिळखिळी झाली असून तेथे जबरदस्तीने पैसे वसुलीची कामे करुन घेतली जातात, विवाहित जोडप्यांना स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलात जीव धोक्यात घालून वावरावे लागते. त्यामुळे अनेक जण आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारत असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली