लोकमत न्यूज नेटवर्क, गडचिरोली: महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा व झारखंडमधील अनेक हिंसक माओवादी कारवायांचा सूत्रधार, जहाल नक्षली नेता आणि केंद्रीय समिती सदस्य नरसिंहचलम ऊर्फ सुधाकर (६९) याचा खात्मा करण्यात ५ जून रोजी जवानांना यश आले. छत्तीसगडमध्ये बिजापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान परिसरात सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. सुधाकरवर सहा राज्यांत मिळून सुमारे तीन कोटींचे बक्षीस होते.
तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठार; सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 05:58 IST