शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray Uddhav Thackeray Rally Live Update : ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! महाराष्ट्रभरातून मराठीप्रेमी मुंबईत, सभास्थळी मोठी गर्दी
2
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
3
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
4
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
5
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
6
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
7
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
8
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
9
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
10
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
11
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
12
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
13
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
14
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
15
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
16
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
18
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
19
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
20
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय

नक्षलग्रस्त भागात : पोलीस दलात काम करण्यासाठी तरूणी सरसावल्या

By admin | Updated: June 26, 2014 23:12 IST

गडचिरोली हा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा आहे. या जिल्ह्यात पोलीस दलाचे काम हे अत्यंत जोखमीचे काम आहे. जंगलात अहोरात्र फिरून नक्षलवाद्यांशी दोन हात करण्याची हिंमत या पोलीस

गडचिरोली : गडचिरोली हा महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त जिल्हा आहे. या जिल्ह्यात पोलीस दलाचे काम हे अत्यंत जोखमीचे काम आहे. जंगलात अहोरात्र फिरून नक्षलवाद्यांशी दोन हात करण्याची हिंमत या पोलीस दलात काम करणाऱ्या प्रत्येकाला ठेवावी लागते. गडचिरोली जिल्ह्यातील तरूण मुली सध्या पोलीस दलातील नोकरीकडे आकृष्ठ झाल्या आहेत. महिलांसाठी एकूण २५ जागा गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस भरतीत आहे. या भरतीसाठी शेकडो महिला उमेदवार यंदा तयारीनिशी उतरल्या होत्या. ही अत्यंत सकारात्मक बाब असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम व अतिदुर्गम भागात पोलीस ठाणे आहेत. पोलिसांवर नेहमी नक्षल विरोधी मोहिमा आखण्याचे काम राहते. या कामाचा सातत्याने दबाव पोलीस दलावर राहतो. साधारणत: पुरूष मंडळी पोलीस दलातील नोकरीला प्राधान्य देतात. परंतु गेल्या काही वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील मुलीही पोलीस दलाच्या नोकरीकडे आकृष्ठ झाल्या आहेत. यंदाच्या गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीत २५ जागा या महिलांसाठी राखीव होत्या. यामध्ये अनुसूचित जाती १०, अनुसूचित जमाती दोन, विमुक्त जाती अ-१, भटक्या जमाती ब- २, भटक्या जमाती ड - १ विशेष मागास प्रवर्ग १, इतर मागास वर्ग १ व खुल्या प्रवर्गासाठी ७ जागा होत्या. या जागांकरीता हजाराच्या वर महिला उमेदवार दाखल झाले होते. कठोर असलेली शारीरिक क्षमता चाचणी पार केल्यानंतर लेखी परीक्षेसाठीही महिला उमेदवारांची मोठी गर्दी यंदा होती. (जिल्हा प्रतिनिधी)