शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

देशी गायी, म्हशींना येणार ‘अच्छे दिन’

By admin | Updated: March 27, 2015 01:10 IST

देशी गायी, म्हशींच्या संरक्षणाकरिता तसेच जतन व संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने १०० टक्के अनुदानावर गुरे पैदास केंद्र राबविण्यात येणार आहे.

आरमोरी : देशी गायी, म्हशींच्या संरक्षणाकरिता तसेच जतन व संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने १०० टक्के अनुदानावर गुरे पैदास केंद्र राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या दारातच त्यांच्या गायी, म्हशींमध्ये कृत्रिम रेतनाची प्रक्रिया करून नैसर्गिक संयोगाकरिता उच्च प्रतिचे वळू उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेतून देशी वंशावळीचा ऱ्हास थांबविण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार आहे. गुरे पैदास योजनेसाठी महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ, अकोला या संस्थेच्या संचालक मंडळास या प्रकल्पाची राज्यस्तरीय तांत्रिक व्यवस्थापन समिती म्हणून काम करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय अंमलबजावणी व संनियंत्रण समिती गठित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त या समितीचे अध्यक्ष राहतील. सदस्यांमध्ये जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विकास अधिकारी, जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी, जिल्ह्यातील गो- पैदासकार संघटनेचा प्रतिनिधी तर समितीचे सदस्य सचिव म्हणून जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयातील सहाय्यक आयुक्त राहतील. गुरे पैदास व दुग्ध विकास कार्यक्रम १२ व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत २०१३ ते २०१७ पर्यंत राबविण्यात येत आहे. तसेच यामधील उर्वरित राहिलेल्या बाबी १३ व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीमध्ये राबविण्यासत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत २०१४- १५ या वर्षात केंद्र शासनाने राष्ट्रीय स्तरावर ३०९ कोटींची तरतूद केली आहे. (प्रतिनिधी)