लोकमत न्यूज नेटवर्कअंकिसा : सिरोंचा तालुक्यातील गोलगुड्डम ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गोलगुड्डम चेक येथील वार्ड क्रमांक ३ मधील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. चिखलातून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.गोलगुड्डम गावातील काही रस्त्यांवर गिट्टी व मुरूम सुध्दा टाकण्यात आले नाही. त्यामुळे पायवाटेप्रमाणे रस्त्यांवर माती पसरली आहे. मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोलगुड्डम चेक येथील रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात चिखल निर्माण झाले आहे. या चिखलातून मार्ग काढताना विद्यार्थी, शेतकरी, दुचाकीस्वार कमालीचे त्रस्त आहेत. कधी पाय घसरून पडतील, याची शाश्वती नाही. चिखलामुळे डास व दुर्गंधीत वाढ झाली आहे.या मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी मधुकर मोर्ला, महेश गुर्ला, सालुबाई मोर्ला, किष्टूबाई मोर्ला लसमाबाई मोर्ला, गंगाधर मोर्ला आदींनी केली आहे.
रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 6:00 AM
गोलगुड्डम गावातील काही रस्त्यांवर गिट्टी व मुरूम सुध्दा टाकण्यात आले नाही. त्यामुळे पायवाटेप्रमाणे रस्त्यांवर माती पसरली आहे. मागील १५ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे गोलगुड्डम चेक येथील रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात चिखल निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देगावकरी त्रस्त : गोलागुड्डम चेकमधील परिस्थिती बिकट