शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
2
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
3
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
4
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
5
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
6
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
7
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
8
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
9
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
10
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
11
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
12
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
13
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
14
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
15
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
16
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
17
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
18
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
19
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
20
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…

खासदार अशोक नेते बालंबाल बचावले, चारचाकीला टिप्परची धडक

By संजय तिपाले | Published: November 04, 2023 3:53 PM

विहिरगावजवळील घटना: एअरबॅग उघडल्याने टळली दुर्घटना

गडचिरोली : येथील भाजपचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाला भरधाव टिप्परने धडक दिली. एअरबॅग उघडल्याने खासदार नेते व चालक व सुरक्षारक्षक बालंबाल बचावले. नागपूरजवळील विहिरीगाव येथे ४ नोव्हेंबरला सकाळी ही घटना घडली.

खासदार अशोक नेते हे ३ नोव्हेंबरला मध्यरात्री मुंबईतून नागपूरला पोहोचले. नागपूर येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करुन ४ नोव्हेंबरला सकाळी ते गडचिरोलीला जाण्यासाठी चारचाकी वाहनाने (एमएच ३३ एए- ९९९०) निघाले होते. विहिरीगावजवळ त्यांच्या वाहनासमोर अचानक टिप्पर आले व  समोरासमोर जोराची धडक झाली. यावेळी खा. नेते यांच्यासह चालक, दोन सुरक्षारक्षक व अन्य एक असे पाच जण वाहनात होते. खा. नेते हे समोरील सीटवर होते. त्यांच्यासह चालकाची एअरबॅग उघडली, त्यामुळे त्या दोघांसह आतील इतर तीन प्रवाशी सुखरुप बचावले. यानंतर मोठी गर्दी झाली. पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. खासदार नेते हे सहकाऱ्यांसमवेत दुसऱ्या वाहनाने गडचिरोलीत पोहोचले.

अपघात होऊनही नेते नियोजित दौऱ्यावर

गडचिरोली- चिमूर हा राज्यात सर्वात विस्तीर्ण व दुर्गम, अतिदुर्गम गावे असलेला लोकसभा मतदारसंघ आहे. या क्षेत्राचे अशोक नेते हे दोन टर्म नेतृत्व करत आहेत. दांडगा जनसंपर्क असलेले लोकप्रतिनिधी म्हणून ते परिचित आहेत. अपघातानंतर ते गडचिरोलीत निवासस्थानी पोहोचले. यावेळी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सर्वांशी संवाद साधून नेते हे अहेरीतील नियोजित दौऱ्यावर गेले. 

विहिरगावजवळ आमच्या वाहनाला आडव्या रस्त्याने आलेला टिप्पर अचानक येऊन धडकला. जोराची आवाज झाला, एअरबॅग उघडल्याने कोणालाही इजा झाली नाही.  मी लगेचच जनसेवेत रुजू झालो आहे. कार्यकर्त्यांनी काळजी करु नये.

- अशोक नेते, खासदार

टॅग्स :AccidentअपघातAshok Neteअशोक नेतेGadchiroliगडचिरोली