शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:19 AM

आदिवासीबहुल अविकसित भामरागड तालुक्यात बीएसएनएलची एकमेव दूरसंचार सेवा आहे. येथे खासगी सेवेचा पर्याय नसताना सुद्धा भ्रमणध्वनीधारकांच्या तक्रारीची बीएसएनएलकडून दखल घेतली जात नाही.

ठळक मुद्देबीएसएनएलचे दुर्लक्ष : भामरागडातील मोबाईलधारक त्रस्त, आॅनलाईन कामांवर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : आदिवासीबहुल अविकसित भामरागड तालुक्यात बीएसएनएलची एकमेव दूरसंचार सेवा आहे. येथे खासगी सेवेचा पर्याय नसताना सुद्धा भ्रमणध्वनीधारकांच्या तक्रारीची बीएसएनएलकडून दखल घेतली जात नाही. परिणामी गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण तालुक्यातील भ्रमणध्वनी सेवा विस्कळीत झाली आहे. सेवा पूर्णत: ठप्प झाल्याने भ्रमणध्वनीधारक त्रस्त झाले आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून अधिकारी व कर्मचाऱ्याविना बीएसएनएलची भ्रमणध्वनीसेवा नाममात्र सुरू होती. मात्र येथे बीएसएनएलचे अधिकारी रूजू झाल्यानंतर थ्री-जी व टू-जी सेवा सुरळीत होती. मात्र ही सेवा सुद्धा सध्या विस्कळीत झाली आहे. एका ठिकाणाहून फोन लागते तर दुसऱ्या ठिकाणावरून संपर्क होत नाही. गेल्या दोन दिवसांपासून थ्री-जी सेवेच्या लाभापासून भ्रमणध्वनीधारक वंचित आहेत. बीएसएनएलची सेवा पूर्णत: ठप्प झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन दिवसानंतर बुधवारी पुन्हा दुपारनंतर बीएसएनएलची टू-जी सेवा सुरू झाली.यासंदर्भात बीएसएनएलचे अधिकारी दीपक कुमार यांना विचारणा केली असता, त्यांनी सांगितले की, अनेक कारणामुळे सोमवारी एक दिवस सेवा बंद होती. येथे डिजिटल जनरेटर येऊन १५ दिवस झाले. हा जनरेटर सुरू करावयाचा आहे.येत्या दोन दिवसांत जनरेटर कार्यान्वित करण्यात आल्यानंतर वीज पुरवठा खंडित झाल्यानंतरही बीएसएनएलची भ्रमणध्वनी सेवा अविरत सुरू राहणार आहे. मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास चंद्रा गावाजवळ केबल लाईन तुटल्यामुळे सेवा ठप्प झाली. पोलीस विभागाला कळविल्यानंतर तुटलेले केबल आज पुन्हा जोडण्यात आली, १० दिवसानंतर भामरागड तालुक्यात बीएसएनएलची थ्री-जी सेवा सुरू होणार आहे, असे दीपक कुमार यांनी सांगितले.पाच दिवसांपासून विजेचा लपंडावभामरागड तालुक्यात मागील पाच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. महाशिवरात्रीनिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रम होत आहेत. परंतु रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर पूर्ववत होत नाही. सोमवारी दिवसा विजेचा लपंडाव होता तर संपूर्ण रात्रभर वीज गायब होती. त्यामुळे नागरिकांना डासांच्या प्रकोपाचा सामना करावा लागला. डासांमुळे रात्री झोपमोड होत आहे. वीज पुरवठा नियमित होत नसल्याने येथील व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. विजेअभावी आॅनलाईन कामे करताना अडचणी येत आहेत. परंतु याकडे वीज कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने वेळीच उपाययोजना कराव्या, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :BSNLबीएसएनएल