शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बेपत्ता शेतकऱ्याचा धडावेगळा मृतदेह; वाघाचा हल्ला की घातपात? मूलचेरा तालुक्यात खळबळ

By संजय तिपाले | Updated: January 20, 2024 12:27 IST

गडचिरोली तालुक्यातील वाकडी जंगलात ३ जानेवारीलाही वाघाने एका महिलेला ठार केले होते

संजय तिपाले, गडचिरोली: दोन महिलांचा बळी घेऊन दक्षिण गडचिरोलीत धुमाकूळ घालणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. मात्र याच वनपरिक्षेत्रात २० जानेवारीला एका बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे खळबळ उडाली. धक्कादायक म्हणजे मृत व्यक्तीचे धड आढळले असू असून शिर गायब आहे. त्यामुळे हा घातपात की वाघाचा बळी असा संभ्रम निर्माण झाला आहे. बापूजी नानाजी आत्राम ( ४५, रा. लोहारा ता. मूलचेरा) असे मयताचे नाव आहे. दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते. मार्कंडा वनपरिक्षेत्रात समाविष्ट असलेल्या रेंगेवाही उपक्षेत्रातील कूप क्र. २९३ मध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला.

जिल्ह्यात व्याघ्र हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ७ आणि १५ जानेवारी रोजी सुषमा देवदास मंडल(५५,रा. चिंतलपेठ), रमाबाई मुंजमकर ( ५५, रा. कोळसापूर) या दोन महिलांचा शेतात काम करताना वाघिणीच्या हल्ल्यात जीव गेला. तत्पूर्वी गडचिरोली तालुक्यातील वाकडी जंगलात ३ जानेवारी रोजी वाघाने एका महिलेला ठार केले होते. 

वाघिणीला पकडण्यासाठी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या 'रॅपिड रिस्पॉन्स टीम'ला पाचारण केले होते. १८ जानेवारी रोजी मध्यरात्री तिला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. याच जंगल परिसरातील रेंगेवाही उपवनक्षेत्रात २० जानेवारीला बापूजी आत्राम या बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी केवळ धड असून शिर गायब आहे, त्यामुळे व्याघ्रहल्ला व घातपात अशा दोन्ही बाजूंनी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूGadchiroliगडचिरोलीFarmerशेतकरी