शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
2
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
3
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
4
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
5
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम
6
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
7
Sex Education: १० वर्षांखालील मुलांना लैंगिक शिक्षणाची माहिती किती आणि कशी द्यावी? 
8
"माझी पत्नी सापडली का?" पोलिसांना रोज विचारायचा; स्वत:च रचलेला हत्येचा भयंकर कट अन्...
9
"पार्थ पवारांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच घात केला, काही नवीन नाही"; शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा गौप्यस्फोट
10
मुंबईच्या नालासोपारा स्टेशनवर लोकलची वाट पाहत उभे होते 'हे' सेलिब्रिटी, ओळखलंत का?
11
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
12
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
13
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
14
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
15
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
16
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
17
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
18
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
19
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
20
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता

गरजूंसाठी गडचिरोलीत ‘मिल ऑन व्हील’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST

अंमलबजावणीसाठी गडचिरोली नगर परिषदेला निधी वर्ग करण्यात आला आहे. नगर परिषदेकडून हे काम महिला आर्थिक विकास महामंडळद्वारा संचालित अन्नपूर्णा माय खानावळ, सखी लोकसंचालित साधन केंद्रामार्फत अन्न शिजवून व पॅकींग करून दिले जात आहे. नागरिकांना हे जेवण ५ रुपयात मिळत असले तरी संबंधित बचत गटाला त्या जेवणापोटी उर्वरित रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून दिली जाणार आहे.

ठळक मुद्देअवघ्या पाच रुपयात जेवण : वेगवेगळ्या भागात फिरत्या गाडीवर व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा प्रशासनाकडून शहरातील गोरगरीब आणि गरजूंना सकाळचा नास्ता आणि रात्रीचे जेवण अवघ्या ५ रुपयात, आणि वेगवेगळ्या भागात पोहोचवून देणाऱ्या ‘मिल ऑन व्हील’ या उपक्रमाचा शुभारंभ गुरूवारी गडचिरोलीत करण्यात आला.जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून एकूण जमा रकमेच्या ३० टक्के निधी कोविड-१९ करीता खर्च करण्याचे आदेश केंद्र तसेच राज्य शासनाने नुकतेच दिले आहेत. पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर गडचिरोली शहरातील गरजू लोकांसाठी जेवणाचे २५० पार्सल दररोज फिरत्या वाहनातून शहराच्या वेगवेगळ्या भागात पोहचविले जात आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी गडचिरोली नगर परिषदेला निधी वर्ग करण्यात आला आहे. नगर परिषदेकडून हे काम महिला आर्थिक विकास महामंडळद्वारा संचालित अन्नपूर्णा माय खानावळ, सखी लोकसंचालित साधन केंद्रामार्फत अन्न शिजवून व पॅकींग करून दिले जात आहे. नागरिकांना हे जेवण ५ रुपयात मिळत असले तरी संबंधित बचत गटाला त्या जेवणापोटी उर्वरित रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून दिली जाणार आहे.शहरात आश्रयास असलेले मजूर, गरीब, भिक्षेकरी, छोटे व्यावसायिक, जवळील भागातून भाजीपाला घेवून आलेले शेतकरी, दवाखान्यातील रु ग्णांचे नातेवाईक इत्यादींना अल्पदरात जेवणाची सोय यातून होणार आहे. ज्यांच्याकडे ५ रूपयेसुद्धा नाहीत त्यांनाही यामधून मोफत जेवणाचे पार्सल दिले जात आहे. सकाळी नास्ता आणि दुपारी शिवभोजन केंद्रावर जेवण व पुन्हा सायंकाळी ‘अन्नपूर्णा आपल्या दारी’ मधून जेवण अशा पध्दतीने दररोज तीन वेळ अन्न पुरविण्याचे काम गडाचिरोली प्रशासनाकडून केले जात आहे. जिल्हा ग्रीन झोनमध्ये असला तरी तेलंगणातून जिल्ह्यात दाखल होत असलेल्या मजूरवर्गाचा ओघ कमी झालेला नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची भिती अजूनही कायम आहे. अशा स्थितीत लॉकडाऊनची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.नगरपरिषदेमार्फत माविम कार्यालयात शुभारंभप्रायोगिक तत्वावर यशस्वी झालेल्या या उपक्र माचा शुभारंभ महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयात नगराध्यक्ष योगिता पिपरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी संजय ओहोळ, माविमच्या वरिष्ठ व्यवस्थापक कांता मिश्रा, नगरसेवक प्रमोद पिपरे व बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या. राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानामधून या योजनेची अंमलबजावणी नगर परिषदेकडून करण्यात येत आहे.जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठानमधून २० लाख रुपयेजिल्हयात असलेला मोठा मजूर वर्ग व संचारबंदीमुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता कोणीही हाताला काम नाही म्हणून कोणीही उपाशी राहणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानमधून २० लाख रुपये देण्यास पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी मंजुरी दिली. यातील पहिला हप्ता रूपये ५ लक्ष नगर परिषदेला वर्ग करण्यात आला आहे. दि. २५ एप्रिलपासून ही योजना प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आल्यानंतर आता दि. ५ जूनपर्यंत दररोज सकाळी नास्ता व सायंकाळी जेवण या पद्धतीने ‘अन्नपूर्णा आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.या फिरत्या भोजन व्यवस्थेत भोजनासाठी नाममात्र ५ रूपये शुल्क ठेवण्यात आले आहे. फारच गरीब व पैसे नसलेल्या गरजूंना आपण मोफत भोजन वितरीत करत आहोत. ही योजना पुढील ४० दिवस सुरू ठेवण्यात येणार असून गरजेनुसार त्यातील २५० थाळीच्या संख्येत वाढही करण्यात येणार आहे. गरजू लोकांनी या याचा लाभ घ्यावा.- दीपक सिंगला, जिल्हाधिकारी

या ठिकाणी मिळतो सकस आहारसकाळचा नास्ता : ५ रुपयात मिळणारा नास्ता सकाळी ८ ते ९.३० या वेळेत मिळणार असून तो जिल्हा क्रीडांगण, शेतकरी बाजार, हनुमान वार्ड, कारगिल चौक, गोकुळनगर, वृद्धाश्रम व इंदिरानगर या ठिकाणी मिळेल.दुपारचे जेवण : ५ रुपयात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत कात्रटवार कॉम्प्लेक्स, चामोर्शी रोड येथील शिवभोजन केंद्रावर हे जेवण मिळत आहे.सायंकाळचे जेवण : ५ रुपयात सायंकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत गडचिरोलीतील हनुमान वॉर्ड, कारगिल चौक, गोकुळनगर, वृद्धाश्रम व इंदिरानगर या ठिकाणी मिळेल. शहरात एकुण ७५० थाळी नास्ता व जेवण दररोज गरजूंना पुरविणे सुरू झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या