शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

कर्तव्याच्या बलिदानातील जपल्या स्मृती

By admin | Updated: September 10, 2014 23:40 IST

माणूस कर्तृत्वाने मोठा होतो. मग ते कर्तृत्व छोटे असो की, मोठे. कर्तृत्वासमोर इतर बाबींना नगन्य स्थान आहे. पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या हिरव्यागार वृक्षांची राखण करतांना स्वत: बलिदान देणाऱ्या

गोपाल लाजुरकर - गडचिरोलीमाणूस कर्तृत्वाने मोठा होतो. मग ते कर्तृत्व छोटे असो की, मोठे. कर्तृत्वासमोर इतर बाबींना नगन्य स्थान आहे. पर्यावरणाचे संतुलन राखणाऱ्या हिरव्यागार वृक्षांची राखण करतांना स्वत: बलिदान देणाऱ्या वनकर्मचाऱ्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. जिल्ह्यातील वनतस्कर व इतर घातपातांमध्ये शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाच्या स्मृतींना वन शहीद दिनानिमित्य वनविभागामार्फत होत असलेल्या उपक्रमामुळे उजाळा दिला जात आहे. हिरव्यागार रानात स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता वन संरक्षण व संवर्धनाचा वसा घेतलेल्या वनकर्मचाऱ्यांचे संपूर्ण आयुष्यच दऱ्या- खोऱ्यात, डोंगर -पहाडात उलटून जाते. वनाचे संरक्षण करणाऱ्या या वनकर्मचाऱ्यांमध्ये कधीही इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आकसाची भावना दाटून येत नाही. जिल्ह्यातील विविध वन विभागांतर्गत नक्षली कारवांयात व तस्करांच्या हल्ल्यात अनेक वनाधिकारी व कर्मचारी, वनमजूर शहीद झाले. या शहीदांच्या स्मृतींना वनकर्मचाऱ्यांच्या संघटनांमार्फत वन शहीद दिनी श्रद्धांजली वाहिली जाते. एकूणच कर्मचाऱ्यांच्या कर्तृत्वाला सलाम केला जातो. स्वत: वन संरक्षण व संवर्धनाच्या पवित्र कार्यात मग्न राहणाऱ्या वन कर्मचाऱ्यांचे जीवनच समर्पित असते. त्यांना एरव्ही समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गर्द वनराईत बस्तान मांडावे लागते. एकूणच वनकर्मचाऱ्यांचे जीवन निसर्गाला समर्पित झालेले असते. गडचिरोली जिल्हा राज्यात वनाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ते केवळ वनसंरक्षणाची जबाबदारी आपल्या छातीवर पेलणाऱ्या वनकर्मचाऱ्यांच्या उत्तुंग कर्तव्यनिष्ठपणामुळेच. वन शहीद दिनानिमित्य जिल्ह्यातील अनेक वनविभागाच्या कार्यालयामध्ये विविध कार्यक्रम राबविले जातात. यातून शहीद वनकर्मचाऱ्यांच्या ध्येयवादातून इतर वनकर्मचाऱ्यांना स्फू र्ती प्राप्त होत असते. जिल्ह्यातील वडसा, पुराडा, बेडगाव, मालेवाडा, देलनवाडी, पोर्ला, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, सिरोंचा यासह विविध वनविभागाच्या कार्यालयांमध्ये उपक्रम साजरे केले जातात. यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी सोनवाने, भगवान आत्राम, मनोज गडवे, अवगान, अनिल साळवे, सुनिल कैदलवार, रमेश बोडे यांच्यासह इतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.