गडचिराेली : बहुतांश महिलांना स्वच्छ व नीटनेटके, तसेच सुंदर राहणे आवडते. विशेष म्हणजे, सुशिक्षित व शहरी भागातील महिला साैंदर्याकडे बारकाईने लक्ष देतात. मात्र, यंदा काेराेना संसर्गाने ब्युटीपार्लरचा व्यवसाय पूर्णत: मंदावला आहे. मास्कने लिपस्टीकची लाली घालवली आहे.
गडचिराेली, आरमाेरी, देसाईगंज, चामाेर्शी शहरांत ब्युटीपार्लरची संख्या बरीच आहे. मात्र, यंदा काेराेनामुळे बाहेरचे संपूर्ण कार्यक्रम बंद झाले आहेत. त्यामुळे नटूनथटून व तयारी करून बाहेर जाण्यास संधी नाही. त्यामुळे पार्लरमध्ये जाणे महिलांनी पूर्णत: बंद केले आहे. काेराेनाच्या काळात घराबाहेर पडताना मास्क वापरावा लागत असल्याने महिलांकडून साैंदर्यप्रसाधनांची खरेदी कमी झाली. विशेष म्हणजे, लाॅकडाऊनच्या काळात साैंदर्यप्रसाधनांची दुकाने पूर्णत: बंद आहेत. काही किराणा दुकानांमध्ये छाेटी-माेठी साैंदर्यप्रसाधने विक्रीसाठी ठेवली जातात. ही साैंदर्यप्रसाधने घराजवळच्या किराणा दुकानातून महिला खरेदी करताना दिसून येत आहेत. मात्र, त्यांची विक्री अत्यल्पच असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
काेट ......
काेराेना महामारीची पहिली लाट ओसरल्यानंतर दिवाळीपासून ब्युटीपार्लरच्या व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. तीन ते चार महिने व्यवसाय बऱ्यापैकी चालला. मात्र, पुन्हा काेराेनाची दुसरी लाट आल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संसर्गाच्या भीतीपाेटी जिल्ह्यातील महिला पार्लरमध्ये जाण्यास तयार हाेत नसल्याचे दिसून येते.
-रंजना रामटेके, पार्लर व्यावसायिक, गडचिराेली
काेट ...
-प्रियंका गहणेवार, ब्युटीपार्लर व्यावसायिक, गडचिराेली
काेट........
काेराेना महामारीच्या समस्येमुळे अत्यावश्यक वस्तूंची वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. दुकान बंद असल्याने आमचा व्यवसाय बुडाला आहे. यापूर्वी काही दिवस दुकाने सुरू हाेती. मात्र, व्यवसाय मर्यादित हाेता. मकर संक्रांतीदरम्यान महिलांनी बाहेर पडून साैंदर्यप्रसाधने व इतर वस्तूंची खरेदी केली. दरम्यान, काेराेना संसर्गाची दुसरी लाट आल्यापासून आम्हा व्यावसायिकांवर आर्थिक संकट काेसळले. काेराेना महामारीचा फटका सर्वच घटकांना बसला आहे. शासनाने आवश्यक ती उपाययाेजना करून मदत करण्याची गरज आहे.
-वैशाली शेरकुरे, साैंदर्यप्रसाधने व्यावसायिक, गडचिराेली
काेट ..........
यावर्षी काेराेनामुळे विवाह समारंभ व इतर सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. काही कार्यक्रम हाेत असले तरी ते मर्यादित व माेजक्या लाेकांच्या उपस्थितीत पार पडत आहेत. काेराेना संसर्गाच्या भीतीने आपण पार्लरमध्ये जाणे बंद केले आहे. घरी साहित्य आणून शक्य हाेईल तेवढ्या प्रमाणात नीटनेटके राहण्याचा प्रयत्न केला जात आहे. काेराेनामुळे वरिष्ठ महाविद्यालयातील वर्ग बंद झाले आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन युवती व अनेक महिलांनी ब्युटीपार्लरकडे पाठ फिरविली आहे. प्रत्येक महिलेने काेराेनाबाबत आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे.
-नेहा भांडेकर, गृहिणी
काेट .......
काेराेना संसर्गाची समस्या उद्भवण्यापूर्वी मी व माझ्या मैत्रिणी दरवर्षीच्या उन्हाळ्याच्या सुटीत महिन्यातून दाेनदा ब्युटीपार्लरमध्ये जायचो. मात्र, यावर्षी काेराेनाच्या भीतीपाेटी पार्लरमध्ये जाणे पूर्णत: बंद आहे. महत्त्वाच्या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी काही महिला पार्लरमध्ये जात आहेत. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून महाविद्यालयीन युवती व महिलांनीसुद्धा काही दिवस पार्लरमध्ये जाणे टाळले पाहिजे. शेवटी आराेग्य महत्त्वाचे आहे. काेराेना खबरदारीबाबत ग्रामीण भागातील महिलांमध्ये याबाबत उदासीनता दिसून येते.
-सारिका चुधरी, गृहिणी