शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत पोलिसांनी लावले २०२ आदिवासी जोडप्यांचे विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 13:26 IST

पोलिस हा जनतेचा सेवक असतो, मित्र असतो, मार्गदर्शक व संरक्षक असतो हे आजवरच्या अनेक उदाहरणांतून अनुभवले असेल. मात्र पोलिस हा सामुदायिक लग्ने लावण्यात पुढाकार घेणारा व ते विनाअडथळा पूर्ण करणारा वडिलधारा व्यक्ती जेव्हा होतो तेव्हा ती एक विशेष बाब ठरते.

ठळक मुद्देनक्षलवाद्यांच्या माहेरघराजवळ आयोजनवरवधूंची वरात पोलिस ठाण्यातून निघाली

आॅनलाईन लोकमतअहेरी-गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात असलेल्या दामरंचा या गावात हे अभिनव आयोजन रविवारी करण्यात आले. विशेष म्हणजे, नक्षलवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाºया कमलापूर या गावापासून दामरंचा हे गाव अवघ्या वीस कि.मी. अंतरावर आहे.पोलिस विभागातर्फे घेण्यात येणाºया जनजागरण मेळाव्यात या वेळी काहीतरी वेगळे करायचे असा निश्चय पोलिस विभागाचा झाला आणि त्यांनी त्यासाठी तयारी सुरू केली. दामरंचाचे पोलीस अधीक्षिक अभिनव देशमुख यांच्या पुढाकाराने अप्पर पोलीस अधीक्षक राजा यांच्या नियंत्रणाखाली व उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांच्या अध्यक्षतेत हा जनजागरण व आदिवासी सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला.या अभूतपूर्व विवाह सोहळ््यात दामरंचाच्या हद्दीत येणाºया २६ गावांमधील गावकरी सहभागी झाले होते. यावेळी २०२ जोडपी विवाहबद्ध झाली. नवपरिणीत दांपत्यांना नवे कपडे व काही आवश्यक वस्तूंची भेटही देण्यात आली. विवाह सोहळा पार पडताच या जोडप्यांची वरात पोलिस स्टेशनमधून वाजतगाजत निघून गावात फिरून पुन्हा पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात आली. या सोहळ््यात जवळपासच्या गावातील सुमारे ३००० नागरिक सहभागी झाले व त्यांनी वधूवरांना आशीर्वाद दिले. उपस्थितांनी आदिवासी नृत्य करून आपला आनंदही साजरा केला. या विवाहाचा समारोप पारंपारिक पद्धतीने आदिवासी भोजनाची मेजवानी देऊन करण्यात आला.हा सोहळा पार पाडण्यात प्रभारी अधिकारी अनिल लवटे, पोलीस उपनिरीक्षक अभिजित भोसले, गणेश मोरे, अप्पासाहेब पडळकर, व्यंकट गंगलवाड आणि अनेक संस्थांनी मदत केली. 

टॅग्स :Policeपोलिस