शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाचे अपहरण करून खून करणाऱ्या माओवाद्यांच्या हस्तकास अटक 

By संजय तिपाले | Updated: March 22, 2024 10:52 IST

भामरागड येथे नाकाबंदी दरम्यान कारवाई : दीड लाखांचे होते बक्षीस 

संजय तिपाले, गडचिरोली : पोलिस अंमलदाराचे अपहरण करून खून, जाळपोळ, दमदाटी करत माओवाद्यांचा हस्तक म्हणून काम करणाऱ्या मोस्ट वाँटेड आरोपीला पोलिसांनी भामरागड येथे २१ मार्च रोजी जेरबंद केले. पेका मादी पुंगाटी (वय ४९, रा. मिरगुळवंचा, ता. भामरागड) असे त्याचे नाव आहे. त्याच्याअटकेसाठी महाराष्ट्र सरकारने दीड लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

फेब्रुवारी ते मे दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात.  या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे अशी कृत्ये करत असतात.  टीसीओसी कालावधी  तसेच आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस दलाने २१ मार्च रोजी भामरागड परिसरात नाकाबंदी सूरू केली होती. क्युआरटी, सीआरपीएफचे जवान व भामरागड पोलिस कर्तव्य बजावत असताना नाकाबंदीच्या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरीत्या वावरत असल्याचे निदर्शनास आले.

त्यास ताब्यात घेऊन अधिक सखोल चौकशी केली असता तो मोस्ट वाँटेड माओवादी हस्तक पेका पुंगाटी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यास अटक केली. १९ डिसेंबर २०२३ रोजी माओवाद्यांनी हिद्दुर गावामध्ये असलेल्या गोटुलजवळ लावलेले ३ ट्रॅक्टर, एक जेसीबी पेटवून  मजुरांना मारहाण व दमदाटी केली होती. या गुन्ह्यात तो सामील होता. सन २०१६ मध्ये एका पोलिस अंमलदाराचे अपहरण करुन खून केल्याच्या अनुषंगाने भामरागड येथे दाखल गुन्ह्यात देखील त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान) यतीश  देशमुख, अहेरीचे अपर अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अमर मोहिते व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.माओवाद्यांना पुरवायचा रेशनचे धान्य 

पेका पुंगाटी हा माओवाद्यांकरता काम करायचा. माओवाद्यांना रेशनचे धान्य पुरविणे, गावातील लोकांना मिटींगसाठी जबरदस्तीने गोळा करणे, माओवादी सप्ताहामध्ये बॅनर लावणे, पत्रके टाकणे अशी कामे तो करीत होता, असे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादी