शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

जहाल नक्षली शंकर रावचा मृत्यू; सहकाऱ्यानेच केली हत्या?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2022 10:29 IST

गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो युवक-युवतींना नक्षल चळवळीकडे आकर्षित करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता.

गडचिरोली : महाराष्ट्रात नक्षल चळवळ रुजविण्याच्या प्राथमिक काळात अग्रस्थानी असणारा आणि नक्षल्यांची सांस्कृतिक विंग सांभाळणारा जहाल नक्षलवादी शंकर राव ऊर्फ आसम शिवा याचा मृत्यू झाला आहे. २८ ऑक्टोबर रोजीच त्याचा मृत्यू झाल्याचे भाकपा (माओवादी) दंडकारण्य पश्चिम ब्यूरोच्या प्रवक्त्याने काढलेल्या पत्रकात स्पष्ट केले. शंकर रावच्या स्मृतीप्रीत्यर्थ २२ नोव्हेंबरला गडचिरोली जिल्ह्यात शोक पाळणार असल्याचेही त्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी एटापल्ली तालुक्यात दिलीप ऊर्फ नितेश हिचामी या नक्षल सदस्याची नक्षल्यांकडूनच हत्या करण्यात आली. जहाल नक्षली शंकर राव याची गोळ्या झाडून दिलीप यानेच हत्या करून फितुरी केल्याचा व तो पोलिसांसाठी काम करत असल्याचा नक्षलवाद्यांचा संशय होता. त्यातूनच दिलीपला जिवे मारल्याचे त्याच्याजवळ सापडलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झाले. 

गट्टा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गर्देवाडा मर्दाकुही गावाजवळ टिपागड दलम सदस्य दिलीप ऊर्फ नितेश हिचामी याची दोन दिवसांपूर्वी गट्टा भामरागड दलमच्या नक्षलवाद्यांनी हात बांधून आणि गळा आवळून हत्या केली. तो २०११ पासून नक्षल चळवळीत सहभागी झाला होता; पण अलीकडे तो फितूर झाला होता आणि पोलिसांना माहिती देत होता, असा संशय नक्षल्यांना होता. दरम्यान नक्षल्यांनी हत्या केलेल्या दिलीप उर्फ नितेश हिचामी याचा पोलिसांशी कोणताही संबंध नव्हता. तो पोलिसांचा खबरी नव्हता, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

तेलगू, गोंडी, माडिया या भाषांमधून तो गाणी लिहीत होता. त्यातून पुढे तो त्यांच्या सांस्कृतिक विंगचा प्रमुख झाल्याचे सांगितले जाते. गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो युवक-युवतींना नक्षल चळवळीकडे आकर्षित करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता.

महाराष्ट्रात नक्षल चळवळ रुजविण्यात महत्त्वाचा वाटा

१९८० च्या दशकात महाराष्ट्रात सर्वप्रथम गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात तत्कालीन आंध्र प्रदेशमधून नक्षल चळवळीने प्रवेश केला. त्यावेळी सिरोंचा तालुक्यातील आसमटोला येथील शंकर राव ऊर्फ आसम शिवा हा साहित्यिक, कलावंत म्हणून नक्षलवाद्यांशी जुळल्या गेला. नक्षलवाद्यांसाठी तो स्फूर्तिदायक गीतरचना करीत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnaxaliteनक्षलवादीDeathमृत्यूGadchiroliगडचिरोली