शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चार कोटींचे इनामी माओवादी ठार! झारखंडच्या जंगलात सहदेव सोरेनसह तिघांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:49 IST

जवानांची मोठी कारवाई : तिघांवर कोट्यवधींचे इनाम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील गोरहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पंटिटरी जंगलात सोमवारी (१५ सप्टेंबर) पहाटे जवान व माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले. या तिघांवर मिळून विविध राज्यांत चार कोटींहून अधिकचे इनाम होते. मृतांत जहाल माओवादी नेता व केंद्रीय समिती सदस्य सहदेव सोरेन याचाही समावेश आहे.

कोब्रा २०९ बटालियन व स्थानिक पोलिसांनी ही संयुक्त मोहीम राबविली. अभियानादरम्यान जंगलात दडून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांवर बेछूट गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवानांनीही त्यांना सडेतोड उत्तर दिले. चकमकीनंतर घटनास्थळावरून ए.के. ४७ रायफलसह मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. सर्व जवान सुखरूप परतले आहेत.

वर्षभरात ३० माओवाद्यांना केले ठार

झारखंडमध्ये चालू वर्षी आतापर्यंत ३० माओवाद्यांना संपविण्यात यश आले आहे. विशेष नक्षलविरोधी पथक कोब्रा, २०९ बटालियनच्या जवानांनी दोन केंद्रीय समिती सदस्य, दोन राज्य समिती सदस्य, चार झोनल समिती सदस्यांसह ३० जहाल नेत्यांना ठार केले. झारखंडमध्ये लागोपाठ आक्रमक कारवाया झाल्यामुळे माओवादी सैरावैरा झाले आहेत.

केंद्रीय समितीला आणखी एक हादरा

छत्तीसगडच्या गरियाबंद येथील चकमकीत ११ सप्टेंबर रोजी केंद्रीय समिती सदस्य मोडेम बालकृष्णा उर्फ बालन्ना मनोज याला कंठस्नान घातले होते. त्यानंतर ११ सप्टेंबरला केंद्रीय समिती सदस्य व जहाल नेता पोथुला पद्मावती उर्फ सुजाता हिने तेलंगणात आत्मसमर्पण केले. १५ सप्टेंबरला सकाळी जहाल नेता सहदेव सोरेन याचा खात्मा करण्यात यश आले. यामुळे माओवाद्यांच्या केंद्रीय समितीला मोठा झटका बसला आहे.

ठार झालेले नक्षली

सहदेव सोरेन - केंद्रीय समिती सदस्यरघुनाथ हेम्ब्रम - स्पेशल कमिटी सदस्यबिरसेन गंझू - झोनल कमिटी सदस्यहे तिघेही नक्षल चळवळीतील महत्त्वाचे कॅडर होते. सहदेव सोरेन याच्या शोधासाठी पोलिसांनी मागील काही महिन्यांपासून सर्च ऑपरेशन तीव्र केले होते.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादीChhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारी