तडजाेडीतून वसूल झाले तब्बल २ काेटी १६ लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 05:00 AM2021-09-26T05:00:00+5:302021-09-26T05:00:51+5:30

२५ सप्टेंबर रोजी येथे आयाेजित  लाेक न्यायालयात तडजोडीस पात्र ९१८ दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून २ काेटी १६ लाख ९७ हजार १६० रुपयांची वसुली करण्यात आली. यामध्ये ट्राफिक चालानच्या दाखलपूर्व प्रकरणांमधील  १४ हजार ७०० रुपयांच्या वसुलीचा अंतर्भाव आहे. किरकोळ स्वरूपाची  ४३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

As many as Rs 2.16 crore was recovered from the settlement | तडजाेडीतून वसूल झाले तब्बल २ काेटी १६ लाख

तडजाेडीतून वसूल झाले तब्बल २ काेटी १६ लाख

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २५ सप्टेंबर रोजी येथे आयाेजित  लाेक न्यायालयात तडजोडीस पात्र ९१८ दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. यातून २ काेटी १६ लाख ९७ हजार १६० रुपयांची वसुली करण्यात आली. यामध्ये ट्राफिक चालानच्या दाखलपूर्व प्रकरणांमधील  १४ हजार ७०० रुपयांच्या वसुलीचा अंतर्भाव आहे. किरकोळ स्वरूपाची  ४३ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधि सेवा प्राधिकरण गडचिरोलीचे अध्यक्ष यू. बी. शुक्ल, व जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव डी. डी. फुलझेले यांच्या देखरेखीखाली लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले हाेते.
जिल्हा न्यायाधीश १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, यू. एम. मुधोळकर यांनी पॅनल क्रमांक १ वर काम पाहिले.  जिल्हा न्यायाधीश २ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. जी. कांबळे यांनी पॅनल क्रमांक २ वर काम पाहिले. पॅनल क्र. ३ वर  दिवाणी न्यायाधीश (व. स्तर) तथा मुख्य न्यायदंडाधिकारी एम. आर. वाशिमकर, तर पॅनल क्र. ४ वर  दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी आर. आर. खामतकर यांनी पॅनल प्रमुख म्हणून काम पाहिले. प्रथमच दाखलपूर्व ट्राफिक केसेसकरिता तिसऱ्या क्रमांकाचे स्वतंत्र पॅनल ठेवण्यात आले हाेते.
पॅनल क्र. १ मध्ये पॅनल सदस्य म्हणून अधिवक्ता कविता सी. मोहरकर आणि विधि स्वयंसेविका वर्षा मनवर, पॅनल क्र. २ मध्ये पॅनल सदस्य म्हणून अधिवक्ता, एस. एस. भट आणि विधि स्वयंसेवक अकील शेख यांनी काम पाहिले. ट्राफिक चालानच्या दाखलपूर्व प्रकरणाकरिता अधिवक्ता प्रणाली वासनिक, विधि स्वयंसेवक, दिनेश बोरकुटे यांनी आणि अधिवक्ता एस. एस. बारसिंगे, समाजसेविका सुरेखा बारसागडे यांनी पॅनल क्रमांक चारची जबाबदारी पार पाडली. 
लाेकअदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रवींद्र दोनाडकर, जिल्हा वकील संघाचे ज्येष्ठ अधिवक्ता आणि इतर न्यायालयातील वकील वृंद व न्यायालयीन कर्मचारी तसेच जिल्हा विधि सेवा प्राधिकरण  गडचिरोलीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले आणि दाखलपूर्व खटले आपसी तडजाेडीने निकाली निघाल्यामुळे अनेकांना दिलासा मिळून खर्चही वाचला आहे.

 

Web Title: As many as Rs 2.16 crore was recovered from the settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.