शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

राकांँचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर

By admin | Updated: June 25, 2014 23:45 IST

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विदर्भात तीन ते चार जिल्हा परिषदांवर भाजपच्या मदतीने सत्ता मिळविली आहे. आता या सत्तेतील भागीदार असलेले राकाँचे काही पदाधिकारी भारतीय जनता पक्षात

निवडणुकीच्या तोंडावर : भाजप प्रवेशाच्या हालचाली सुरूगडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विदर्भात तीन ते चार जिल्हा परिषदांवर भाजपच्या मदतीने सत्ता मिळविली आहे. आता या सत्तेतील भागीदार असलेले राकाँचे काही पदाधिकारी भारतीय जनता पक्षात रितसर प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे खिंडार पडणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. १६ व्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पानिपत झाले. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला कितपत यश मिळते. याबाबत अनेक नेते साशंक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून पराभव पत्करण्यापेक्षा भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढण्याची त्यांनी तयारी चालविली आहे. विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती अतिशय कमकूवत आहे. भाजपच्या कुबड्यांच्या भरवशावर चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, अमरावती या जिल्हा परिषदांमध्ये राकाँने कशीबशी सत्ता मिळविली होती. अनेकदा जातीयवादी पक्षाशी असलेली युती तोडून टाकू, असे राकाँच्या नेत्यांनी जाहीर केले. मात्र कुणीही खुर्ची सोडली नाही. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम करीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील काही नेते तयारीला लागले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा आपल्या १९९९ च्या जुन्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या भरवशावर उभा राहिल, असे चिन्ह दिसत आहे. काँग्रेसकडे असलेल्या अनेक मतदार संघावर राकाँने आपला दावा सांगितला आहे. हे मतदार संघ आपल्या वाट्याला येणार नाही, याची पूर्ण कल्पना असलेले राकाँचे हे नेते आता भाजपच्या वाटेने मार्गस्थ होतील. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचीही या नेत्यांनी दिल्ली येथे भेट घेतली व गडचिरोली जिल्ह्यातील एका मतदार संघात उमेदवारी निश्चित करण्याबाबत चर्चा केली, अशी माहिती आहे. याबाबत भाजपच्या स्थानिक खासदारांनीही लोकमतशी बोलताना काही दिवसांपूर्वी दुजोरा दिला होता. मात्र अद्याप अंतिम चर्चा झालेली नाही, असे ते म्हणाले होते. हे नेते कोण असतील या विषयी भाजपसह राकाँच्याही गोटात उत्सुकता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)