शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे तुम्ही पंज्याला मत द्यायला जाताय, काहीच वाटत नाही का? गुलाबराव पाटलांचा बोचरा सवाल
2
"मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, पण शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो"
3
या निवडणुकीनंतर राज्यातील काही दुकाने बंद होतील, त्यात राज ठाकरेंचेही दुकान; राऊतांची टीका
4
Swati Maliwal : "माझं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न..."; स्वाती मालीवाल यांनी मारहाण प्रकरणावर मांडली व्यथा
5
निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास 'प्लॅन बी' काय?; अमित शाहांनी सांगितलं विजयाचं सीक्रेट
6
'ममता बॅनर्जींची किंमत किती, 10 लाख?'; माजी न्यायमूर्ती, नेत्याचे आक्षेपार्ह वक्तव्य, टीएमसी संतप्त 
7
ठाणे, अहमदाबाद अन् शेवटी हॉटेल बदलण्यासाठी तयारी...; भावेश भिंडे पोलिसांना कसा सापडला?
8
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
9
Narendra Modi : "मुलाला 99 गुण मिळाले तर..."; 400 पार करण्याच्या टार्गेटवर नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
10
प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत
11
अशी महिला, जिनं उभं केलं ₹७००० कोटींचं साम्राज्य; नंतर त्याच कंपनीतून काढून टाकलं, वाचा कोण आहेत त्या?
12
पहिल्याच भेटीत तैमूरचं वागणं पाहून थक्क झाला जयदीप अहलावत; म्हणाला, 'तो मोठ्या स्टाइलमध्ये...'
13
'मुंबई पुणे मुंबई 4' कधी येणार? मुक्ता बर्वे म्हणाली, "मी, स्वप्नील आणि सतीश...'
14
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
15
२०१४ पासून पत्रकार परिषद का घेतली नाही? पंतप्रधान मोदी म्हणाले, 'मी संसदेला उत्तरदायी'
16
"आजवर तुम्ही चुकीचं नाव घेताय..", अखेर ईशा देओलने सांगितला तिच्या नावाचा खरा उच्चार
17
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
18
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
20
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

पहिल्याच दिवशी सेमानातील हनुमानजीची मनाेभावे पूजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2020 5:00 AM

हा नियम सेमाना देवस्थानालाही लागू पडला व २४ मार्चपासून सेमाना देवस्थान कुलूपबंद झाले. अनेक भाविक बाहेरूनच दर्शन घेऊन परत जात हाेते. साेमवारपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी दिल्यानंतर सेमाना देवस्थान सुद्धा भाविकांसाठी उघडण्यात आले.

ठळक मुद्देदेवस्थानात उसळली बऱ्यापैकी गर्दी

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनामुळे २४ मार्चपासून कुलुपबंद करण्यात आलेले सेमाना देवस्थान शासनाच्या आदेशानंतर साेमवारी उघडण्यात आले. आठ महिन्यांपासून हनुमानजीचे दर्शन घेण्यासाठी आतुर असलेल्या भक्तांनी साेमवारी हनुमानजीची मनाेभावे पूजा केली.गडचिराेली शहरापासून तीन किमी अंतरावर असलेले चामाेर्शी मार्गावरील सेमाना देवस्थान हे गडचिराेलीवासीयांचे आराध्य दैवत आहे. साेमवार, गुरूवार व शनिवारी येथील हनुमानजींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळत हाेती. मात्र शासनाने मंदिर, मस्जिद, चर्च व अन्य धार्मिकस्थळे कुलूपबंद करण्याचे निर्देश दिले. हा नियम सेमाना देवस्थानालाही लागू पडला व २४ मार्चपासून सेमाना देवस्थान कुलूपबंद झाले. अनेक भाविक बाहेरूनच दर्शन घेऊन परत जात हाेते. साेमवारपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्याची परवानगी दिल्यानंतर सेमाना देवस्थान सुद्धा भाविकांसाठी उघडण्यात आले.साेमवारी सकाळपासूनच भाविकांची थाेडीफार गर्दी सेमाना देवस्थान परिसरात जमायला लागली. प्रत्यक्ष हनुमानजींचे दर्शन घेऊन मनाेभावे पूजा केल्याने आपल्याला आत्मिक शांती मिळाली, अशी प्रतिक्रिया भाविकांनी दिली.  यानंतर आता भेट देणाऱ्यांची संख्या वाढणार आहे.

शासनाचे नियमभाविकांची गर्दी झाल्यास रांगीतील दाेन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर आवश्यक आहे. मंदिर परिसरात थुंकण्यास सक्त मनाई आहे. मंदिरात प्रवेश करताना साबणाने हातपाय स्वच्छ धुणे किंवा जंतुराेधकाने हातांचे निर्जुतीकीकरण करणे बंधनकारक आहे. आजाराची लक्षणे असल्यास प्रवेश नाकारला जाईल. काेराेनाबाबत जनजागृती करण्याची व्यवस्था धार्मिकस्थळी संबंधित व्यवस्थापनाने करावी. दर्शनासाठी जागा निश्चित करावी. प्रवेेशासाठी आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र दरवाजे असावेत. असे नियम शासनाने केले आहेत.

मंदिर उघडण्याच्या पूर्वी मंदिराचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. मंदिरात प्रवेश करतेवेळी प्रत्येकाने साेशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, यासाठी परिसरात फलक लावले जातील. तसेच कर्मचाऱ्यांमार्फतही भाविकांना सूचना दिल्या जातील. मंदिर परिसरात प्रवेश करतेवेळी प्रत्येकाने मास्क घालणे आवश्यक आहे.- अरूण निंबाळकर, सचिव, श्री क्षेत्र सेमाना हनुमान देवस्थान समिती, गडचिराेली