शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह विधान भोवले; माना समाज आक्रमक, माजी मंत्री शिवाजीराव मोघेंविरुद्ध मोर्चा

By संजय तिपाले | Updated: October 13, 2023 16:36 IST

वादग्रस्त विधान केल्याने व्यक्त केला रोष

गडचिरोली : माना समाजाबद्दल माजी मंत्री व काँग्रेस नेते शिवाजीराव मोघे यांनी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ कुरखेडा येथे उपविभागीय कार्यालयावर १३ ऑक्टोबरला मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोघे यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करुन पोलिस ठाण्यात तक्रारही दिली.

 नागपूर येथे पार पडलेल्या आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी आपली सत्ता आल्यास वरिष्ठ आयोग नेमून अनुसूचित जमाती प्रवर्गात चुकीने समावेश करण्यात आलेल्या माना समाजाला काढून टाकू, असे वादग्रस्त विधान केले होते. यावेळी मंचावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी उपस्थित होते. मोघेंच्या या वादग्रस्त विधानावरून माना समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी निषेध नोंदविण्यात येत आहे. शुक्रवारी कुरखेडा शहरात माना समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढला.  त्यांनी संपूर्ण माना समाजाचा अपमान केला आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात तेढ निर्माण करून अशांतता निर्माण केली आहे,  असा आरोप समाजबांधवांनी यावेळी केला.  माना समाज १८ व्या क्रमांकावर

माना ही स्वतंत्र आदिवासी जमात असून जिल्ह्यात मोठी संख्या आहे.  समाजाच्या स्वतंत्र धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरा आहेत. केंद्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीत माना समाज १८ व्या क्रमांकावर आहे. सन १९५५ मध्ये काका कालेलकर आयोगाने माना समाजाला अनुसूचित जमातीचे सर्व अधिकार व हक्क बहाल केले होते. तेव्हापासूनच माना समाज अनुसूचित प्रवर्गात मोडतो, असा दावा माना समाजबांधवांनी केला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनShivajirao Mogheशिवाजीराव मोघेGadchiroliगडचिरोली