शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सहसचिवाच्या नावे बनावट बदली आदेश पाठविणारा पोलिस पती जेरबंद

By संजय तिपाले | Updated: June 5, 2023 17:28 IST

पत्नीच्या बदलीसाठी काहीपण... ब्रम्हपुरीतून एसपींना ई- मेल पाठविल्याचे उघड

गडचिरोली : राज्याच्या गृहविभागाच्या सहसचिवांच्या नावे पोलिस अधीक्षकांना  ई- मेलद्वारे दोन अंमलदारांच्या बदल्यांचे बनावट आदेश दिल्याचे धक्कादायक प्रकरण महिनाभरापूर्वी घडले होते. याचाउलगडा करण्यात पोलिसांना यश आले असून हा बदली आदेश एका महिला अंमलदाराच्या पतीनेच केल्याचे निष्पन्न झाले. गुन्हे शाखेने त्यास जेरबंद केले असून तो सध्या कोठडीत आहे.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना ९ मे २०२३ रोजी गृह विभागाच्या कार्यालयाचा पत्ता असलेला ई- मेल प्राप्त झाला होता.यात पोलिस मदत केंद्र धोंडीराज (जि.गडचिरोली) येथील हवालदार जमीलखान पठाण यांची पोलिस अधीक्षक कार्यालय, नक्षल  सेल व पोलिस मदत केंद्र गट्टाजाभिया येथील अंमलदार मीनाक्षी पोरेड्डीवार यांची पोलिस उपमहानिरीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे तात्पुरती बदली केल्याचा उल्लेख होता. त्याखाली सहसचिव म्हणून व्यंकटेश भट यांचे नाव व स्वाक्षरी होती. 

गृहविभागाच्या नियमित ई- मेलवरुन हा मेल आला नव्हता. शिवाय अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश गृहविभागातून निघत नाहीत.  त्यामुळे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांना शंका आली. त्यांनी सायबर विभागाकडे चौकशी सोपवली. उपनिरीक्षक सागर आव्हाड यांनी गृहविभागात जाऊन चौकशी केली असता हा मेल त्यांनी पाठविलाच नसल्याचे स्पष्ट झाले. उपनिरीक्षक नीलेश वाघ यांच्या फिर्यादीवरुन  गडचिरोली ठाण्यात फसवणूक व माहिती - तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदविला, त्यानंतर  गुन्हे शाखेचे पो.नि. उल्हास भुसारी यांनी तपासचक्रे गतिमान केली.

मुंबईचा पत्ता, ई- मेल पाठविला ब्रम्हपुरीतून

पोलिस निरीक्षक उल्हास भुसार यांनी तांत्रिक तपास केला असता ई- मेल मुंबईवरुन नव्हे तर ब्रम्हपुरी (जि.चंद्रपूर) येथील एका नेट कॅफेवरुन आल्याचे उघड झाले. त्यानुसार, चौकशी केली असता हा ई- मेल पोलिस अंमलदार मीनाक्षी पोरेड्डीवार यांचा पती संदीप मड्डेलवार (रा.वनश्री कॉलनी, गडचिरोली) याने पाठविल्याचे समोर आले. त्यास २ जून रोजी ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला  आढेवेढे घेतले, पण खाक्या दाखविताच त्याने गुन्हा कबूल केला. न्यायालयाने त्यास चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

दोन अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश थेट गृहमंत्रालयातून प्राप्त झाले, तेव्हाच या मेलबाबत शंका आली, त्यानंतर  हा मेल बनावट असल्याचे निष्पन्न झाल्यावर गुन्हा नोंदवून तपास केला. एका महिला अंमलदाराच्या पतीला अटक केली आहे. यात महिला अंमलदाराचा सहभाग आहे का, याचा तपास सुरु आहे. 

- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTransferबदलीPoliceपोलिसGadchiroliगडचिरोली