पुरूष नसबंदीत जिल्हा प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 11:11 PM2017-11-17T23:11:11+5:302017-11-17T23:12:04+5:30

राज्यातील मागास आणि नक्षलपिडीत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात पुरूष नसबंदीचे प्रमाण सर्वाधिक आहे.

Male sterilization district first | पुरूष नसबंदीत जिल्हा प्रथम

पुरूष नसबंदीत जिल्हा प्रथम

Next
ठळक मुद्देदेशभरातून मारली बाजी : दिल्लीत आरोग्य विभागाकडून सत्कार

सुनील चौरसिया।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राज्यातील मागास आणि नक्षलपिडीत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात पुरूष नसबंदीचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०१६-१७ या वर्षात गडचिरोली जिल्ह्याने पुरूष नसबंदी कार्यक्रमात कार्यक्रमात देशभरात पहिले स्थान पटकावले आहे हे विशेष. यात दुसºया स्थानी कोलकाता आहे.
गुरूवारी राजधानी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय कार्यशाळेत यासाठी गडचिरोली जिल्ह्याला सन्मानित करण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य विभागाला वर्ष २०१६-१७ करिता कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत २ हजार ७९० पुरूष नसबंदीचे लक्ष्य देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात ३००१ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आल्यात. त्यामुळे या कामात राज्यातच नाही तर देशभरात गडचिरोलीने पहिले स्थान पटकावले.
दिल्ली गुरूवारी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव डॉ.वंदना गुरनानी, आयुक्त डॉ.एस.के. सिकदर यांच्या हस्ते गडचिरोलीत हा कार्यक्रम राबविणारे डॉ.सुनील मडावी यांना सन्मानित करण्यात आले. त्यासाठी त्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशीकांत शंभरकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Male sterilization district first

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.