कुरखेडा तालुक्याला काॅंग्रेसचा गड बनवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:41 IST2021-08-13T04:41:49+5:302021-08-13T04:41:49+5:30

कुरखेडा: जिल्ह्यात विपरीत परिस्थितीतसुद्धा कुरखेडा तालूका काॅंग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिला आहे. पक्षाची ताकत पुन्हा अधिक मजबूत करण्याकरिता तालुका पदाधिकारी ...

Make Kurkheda taluka a stronghold of Congress | कुरखेडा तालुक्याला काॅंग्रेसचा गड बनवा

कुरखेडा तालुक्याला काॅंग्रेसचा गड बनवा

कुरखेडा: जिल्ह्यात विपरीत परिस्थितीतसुद्धा कुरखेडा तालूका काॅंग्रेस पक्षाच्या पाठीशी राहिला आहे. पक्षाची ताकत पुन्हा अधिक मजबूत करण्याकरिता तालुका पदाधिकारी यांनी प्रत्येक बूथपर्यंत पोहचत संघटनेची बांधणी करावी व तालुक्याला काॅंग्रेसला मजबूत गड बनवावे, असे आवाहन काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले

आगामी नगर पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक संदर्भात आढावा व संघटन बांधणीकरिता कुरखेडा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मार्गदर्शन करीत हाेते. प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा अध्यक्ष हसन गिलानी, जि प उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, माजी जि प उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य जीवन नाट, तालुका काॅंग्रेस अध्यक्ष जयंत हरडे, जि प सदस्य प्रभाकर तूलावी, प्रल्हाद कराडे, तालुका यूवक काॅंग्रेस अध्यक्ष गिरीधर तितराम, पं. स. उपसभापती श्रीराम दूगा, जिल्हा उपाध्यक्ष पंकज गूड्डेवार, माजी नगराध्यक्ष आशा तुलावी, सेवादलाचे अध्यक्ष दिवाकर मारगाये, माजी नगरसेवक उस्मान खान, सिंधू तितिरमारे, प्रतिभा सिडाम, रोहित ढवळे, अरुण उईके, मंगेश वालदे, प्रेमलाल सहारे, रऊफ शेख, दादाजी आळे, रुकसार शेख, अगरसिगं खडाधार, सरपंच मंजुळा मारगाये, अनसूया पेंदाम, मधुकर गावळे, आशा नैताम, संजय नाकतोडे, सरपंच अशोक उसेंडी उपस्थित हाेते.

120821\img_20210812_171540.jpg

मार्गदर्शन करताना कांग्रेस जिलाध्यक्ष डॉ नामदेव उसेंडी

Web Title: Make Kurkheda taluka a stronghold of Congress