शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

Maharashtra Election 2019 ; प्रचारसभांचा धुराळा उठणार शेवटच्या टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 6:00 AM

जिल्ह्यातील तीनही मतदार संघात निवडणूक रिंगणात असलेल्या ३७ उमेदवारांमध्ये बहुतांश उमेदवार अपक्ष आहेत. त्यातही अनेक जण पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे आपल्या मतदार संघातील गावे पिंजून काढताना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. अपक्षांच्या प्रचारासाठी कोणत्याही नेत्यांची सभा होणार नसल्यामुळे त्यांचा आपल्या स्तरावर प्रचार सुरू आहे.

ठळक मुद्देउमेदवारांचा जनसंपर्कच येणार कामात : प्रशिक्षणाच्या सत्रांमधून प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्णत्वाकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघा आठवडाभर शिल्लक आहे, पण अद्याप तरी मोठ्या नेत्यांच्या प्रचारसभांचा धुराळा उठण्यास वेग आलेला नाही. काही अपवाद सोडल्यास अद्याप मोठ्या नेत्यांच्या सभांचे नियोजन झाले नसल्याने सध्यातरी उमेदवारांची मदार वैयक्तिक जनसंपर्क आणि मतदारांमध्ये आपली प्रतिमा उजळ करण्यावरच आहे. हाती असलेल्या मोजक्या दिवसात कोण आपली प्रतिमा अधिक उजळवतो यावरच त्यांचा खेळ अवलंबून राहणार आहे.जिल्ह्यातील तीनही मतदार संघात निवडणूक रिंगणात असलेल्या ३७ उमेदवारांमध्ये बहुतांश उमेदवार अपक्ष आहेत. त्यातही अनेक जण पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. त्यामुळे आपल्या मतदार संघातील गावे पिंजून काढताना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे. अपक्षांच्या प्रचारासाठी कोणत्याही नेत्यांची सभा होणार नसल्यामुळे त्यांचा आपल्या स्तरावर प्रचार सुरू आहे. परंतू प्रमुख पक्षीय उमेदवारांना आपल्या बाजुने वातावरण निर्मिती करण्यासाठी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या सभांची प्रतीक्षा लागली आहे.प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यात भाजप किंवा काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवर नेत्यांची सभा होण्याची शक्यता नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. मात्र राज्य पातळीवरील स्टार प्रचारकांच्या सभा पुढील आठवड्यात होणार आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी गडचिरोलीत तर शुक्रवारी अहेरीत सभा घेऊन जाहीर सभा घेतल्या. याशिवाय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याही सभा लवकरच होणार आहेत. काँग्रेसचे केंद्रीय नेते मुकूल वासनिक शनिवारी गडचिरोलीत काँग्रेस प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांनी सांगितले. मात्र काँग्रेस नेत्यांच्या जाहीर सभांचे नियोजन अद्याप झालेले नाही.दरम्यान प्रशासकीय यंत्रणेकडून निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सत्र सुरू आहे. गडचिरोली, अहेरी आणि आरमोरीत हे प्रशिक्षण सुरू असून बाहेरून आलेले आयोगाचे निरीक्षक प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवून आहेत.निवडणुकीत ड्युटी आणि प्रशिक्षणामुळे अनेक कार्यालयातील कामकाज मात्र प्रभावित झाले आहे.आतापर्यंत पकडली ७ लाखांची रक्कमनिवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून ठिकठिकाणी तपासणी नाके आणि भरारी पथकांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यात अनधिकृतपणे होणाºया रोख रकमेच्या वाहतुकीला आळा घालण्याचा प्रयत्न प्रशासकीय यंत्रणेकडून केला जात आहे. त्यात आतापर्यंत अहेरी आणि गडचिरोली मतदार संघात प्रत्येकी ३ कारवायांमध्ये ७ लाखांपेक्षा अधिक रक्कम पकडण्यात आली. जिल्हा खर्च नियंत्रण समितीने संबंधितांचे बयाण घेऊन पडताळणी केल्यानंतर त्यापैकी ४ ठिकाणी पकडलेली ४ लाखांची रक्कम परत केली, पण दोन ठिकाणची ३ लाख १७ हजार रुपयांची रक्कम अजून जप्त असून त्याबाबतची चौकशी सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोणावरही आचारसंहिता भंग झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.उमेदवाराच्या अपहरण प्रकरणातील आरोपी फरारआरमोरी मतदार संघातील अपक्ष उमेदवार तथा माजी पंचायत समिती सभापती बगुजी ताडाम यांच्या अपहरण आणि निवडणूक प्रचारास मनाई प्रकरणी गुन्हे दाखल असलेले काँग्रेसचे उमेदवार, माजी आमदार आनंदराव गेडाम त्यांचे पूत्र लॉरेन्स आणि इतर सर्व आरोपी गायब असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील सर्व आरोपींवर भादंवि कलम १७१ क, १४३, १४७, १४९, ३२३, ३४१, ३४२, ३६५, ३९२, ५०६, सहकलम १३५ अन्वये गुन्हे दाखल आहेत. अटकपूर्व जामिनासाठी ते प्रयत्नशिल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऐन निवडणूक प्रचाराच्या काळात हे संकट ओढवल्याने गेडाम अडचणीत सापडले आहे. विशेष म्हणजे शुक्रवारी आरमोरीत त्यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनालाही ते उपस्थित नव्हते. अखेर जिल्हाध्यक्षांच्या हस्ते उद्घाटनाची औपचारिकता पार पाडण्यात आली.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली