Maharashtra Election 2019 ; गजबे, होळी, गेडाम यांचे नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 01:07 AM2019-10-04T01:07:17+5:302019-10-04T01:08:42+5:30

गजबे यांचे नामांकन भरताना खासदार अशोक नेते, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. शुक्रवारी अहेरीत अम्ब्रिशराव आत्राम आणि धर्मरावबाबा शक्तीप्रदर्शन करत नामांकन दाखल करणार आहेत. याशिवाय अनेक अपक्षही नामांकनासाठी धाव घेणार आहेत.

Maharashtra Election 2019 ; Gazabe, Holi, Gedam Nominations | Maharashtra Election 2019 ; गजबे, होळी, गेडाम यांचे नामांकन

Maharashtra Election 2019 ; गजबे, होळी, गेडाम यांचे नामांकन

Next
ठळक मुद्देआज पुन्हा माहौल : शक्तीप्रदर्शन करणार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विधानसभेसाठी नामांकन दाखल करण्यासाठी एक दिवस शिल्लक असताना काही प्रमुख उमेदवारांसह अनेक अपेक्षांनी नामांकन दाखल केले. त्यात आरमोरीतून कृष्णा गजबे व अहेरीत दीपक आत्राम यांनी शक्तीप्रदर्शन करत नामांकन भरले. तर आनंदराव गेडाम, डॉ.देवराव होळी, डॉ.चंदा कोडवते आदी प्रमुख उमेदवारांनी साध्या पद्धतीने जाऊन नामांकन भरले. मात्र शुक्रवारी ते शक्तीप्रदर्शन करणार आहेत.
गजबे यांचे नामांकन भरताना खासदार अशोक नेते, सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार, जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. शुक्रवारी अहेरीत अम्ब्रिशराव आत्राम आणि धर्मरावबाबा शक्तीप्रदर्शन करत नामांकन दाखल करणार आहेत. याशिवाय अनेक अपक्षही नामांकनासाठी धाव घेणार आहेत.
वाहतुकीचा खोळंबा
अहेरीत गुरूवारी आपल्या नेत्याचे नामांकन दाखल करण्यासाठी ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांची चार चाकी वाहने रस्त्याच्या कडेला उभी ठेवली होती. त्यामुळे प्राणहिता पोलीस उपमुख्यालय ते बेझलवार महाविद्यालयापर्यंत वाहतूक खोळंबली होती. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आणणारी स्कूल बस, दोन रुग्णवाहिका अडकल्या होत्या. अनेक विद्यार्थी पायीच निघाले. उपनिरीक्षक विनायक दडस पाटील, शेरा पठाण, वाहतूक पोलीस कर्मचारी अजय तेलंग, रवींद्र चौधरी यांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

भगव्या झेंड्यांनी नागरिक बुचकळ्यात
संभाजी ब्रिगेडच्या वतीने दिलीप मडावी यांनी गडचिरोलीत नामांकन दाखल करताना भगवे झेंडे हाती घेतलेले कार्यकर्ते रॅलीने येऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर जमले होते. हे झेंडे शिवसेनेच्या झेंड्यांशी मिळतेजुळते असल्यामुळे लोक बुचकळ्यात पडत होते. जिल्ह्यात शिवसेनेचे कोणीही उमेदवार नसताना एवढे शिवसैनिक कशासाठी आले, असा प्रश्न हे दृष्य पाहणाऱ्यांना पडत होता.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Gazabe, Holi, Gedam Nominations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.