Maharashtra Election 2019 : ३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 05:00 AM2019-10-22T05:00:00+5:302019-10-22T05:00:59+5:30

निवडणुकीत गडचिरोली मतदार संघात १६, आरमोरी मतदार संघात १२ तर अहेरी मतदार संघात ९ उमेदवार रिंगणात होते. येत्या गुरूवारी (दि.२४) तीनही मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मुख्यालयी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. मतदान हा लोकशाहीचा उत्सव ठरून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी गडचिरोली, घोट, धानोरासह इतर गावांमधील मतदान केंद्रे एखाद्या लग्न मंडपाप्रमाणे सजविण्यात आली होती. मतदान करण्याविषयी जनजागृती करणाºया बॅनरच्या मदतीने आकर्षक गेट तयार करण्यात आले होते. पहिल्यांदाच अशा पद्धतीने केंद्रे सजल्यामुळे या उत्सवातील उत्साह आणखी वाढल्याचे दिसून आले.

Maharashtra Election 2019 : Future EVMs of 37 candidates | Maharashtra Election 2019 : ३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमबंद

Maharashtra Election 2019 : ३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमबंद

Next
ठळक मुद्देदहशत झुगारून विक्रमी मतदान : लोकशाहीच्या उत्सवासाठी लग्नमंडपाप्रमाणे सजली होती केंद्रे

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षली दहशतीच्या सावटातही विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी उत्स्फूर्त मतदान झाले. अनेक अडचणींवर मात करत दुर्गम भागातही नागरिकांनी मतदानाला भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे यावेळच्या मतदानाने ६७.५० टक्केचा आकडा पार केला आहे. रात्री उशिरापर्यंत मतदानाची अंतिम टक्केवारी आलेली नव्हती. या निवडणुकीत तीनही मतदारसंघातील ३७ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएमबंद झाले आहे. विशेष म्हणजे निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुसूचित घटना, हिंसक कारवाया रोखण्यात प्रशासन व पोलीस यंत्रणेला यश आले. त्यामुळे लोकशाहीचा हा उत्सव यावेळी नवीन विक्रम करणारा ठरला आहे.
या निवडणुकीत गडचिरोली मतदार संघात १६, आरमोरी मतदार संघात १२ तर अहेरी मतदार संघात ९ उमेदवार रिंगणात होते. येत्या गुरूवारी (दि.२४) तीनही मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मुख्यालयी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.
मतदान हा लोकशाहीचा उत्सव ठरून जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी गडचिरोली, घोट, धानोरासह इतर गावांमधील मतदान केंद्रे एखाद्या लग्न मंडपाप्रमाणे सजविण्यात आली होती. मतदान करण्याविषयी जनजागृती करणाºया बॅनरच्या मदतीने आकर्षक गेट तयार करण्यात आले होते. पहिल्यांदाच अशा पद्धतीने केंद्रे सजल्यामुळे या उत्सवातील उत्साह आणखी वाढल्याचे दिसून आले.
विधानसभा निवडणुकीसाठी जास्तीत मतदान व्हावे, यासाठी मागील एक महिन्यापासून प्रशासन प्रयत्न करीत होते. विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. मतदानाला महोत्सवाचे स्वरूप प्राप्त होऊन मतदार मतदानासाठी आकर्षित व्हावे, यासाठी काही ठिकाणचे मतदान केंद्रे सजविण्यात आली होती. मृणाल कुलकर्णी, माधुरी दीक्षित यांचे मतदानासाठी आवाहन करणारे छायाचित्र लावण्यात आले होते. मतदान केंद्रावर शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मंडपही टाकण्यात आले होते. त्यामुळे रांगेत उभे राहून मतदान करणाºया नागरिकांची गैरसोय टळण्यास मदत झाली. प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
मतदानासाठी भरलेल्या नाल्यातून प्रवास
लाहेरी - भामरागड तालुक्यातील लाहेरी हा नक्षलग्रस्त व घनदाट जंगलाने व्यापलेला परिसर आहे. लाहेरी हे या परिसरातील सर्वात मोठे गाव आहे. होड्री गावचे मतदान लाहेरी येथील मतदान केंद्रावर होते. रविवारी रात्री लाहेरी परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे लाहेरी व होड्री या दोन गावांच्या मध्ये असलेला नाला ओसंडून वाहत होता. तरीही मतदारांनी नाला पार करीत लाहेरी गाठून मतदान केले. होड्री गावाला जाणाºया या नाल्यावर पूल बांधावा, अशी मागणी नागरिकांकडून अनेकवेळा करण्यात आली आहे. राजकीय व्यक्ती केवळ आश्वासने देतात. मात्र पुलाचे बांधकाम केले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. तरीही नागरिकांनी मतदान केंद्र गाठले.
एटापल्लीतील केंद्रांमध्ये
सुविधांचा अभाव
एटापल्ली - येथे चार मतदान केंद्रे होती. मात्र यातील एकही मतदान केंद्र सजविण्यात आले नव्हती. पाण्याचीही व्यवस्था नव्हती. अपंग व वृद्ध मतदारांना आणण्यासाठी व्हिलचेअर उपलब्ध करून देण्याचे निर्देश होते. तरीही एटापल्ली येथील एकाही मतदान केंद्रावर व्हिलचेअर उपलब्ध नव्हती. परिणामी वृद्ध व अपंग नागरिकांना दुचाकी किंवा सायकलवर आणावे लागत होते.
यादीतून नावे गायब
मुरूमगाव - धानोरा तालुक्याचा काही भाग आरमोरी विधानसभा क्षेत्रात मोडतो. यात प्रामुख्याने मुरूमगाव परिसरातील गावांचा समावेश आहे. मुरूमगाव परिसरातील गावांमध्ये एकूण १० मतदान केंद्रे होती. त्यापैकी मुरूमगाव येथील पहिल्या क्रमांकाच्या मतदान केंद्रावर ७२ टक्के, दुसºया क्रमांकाच्या मतदान केंद्रावर ७८ टक्के मतदान झाले. तसेच बेलगावात ७६, कुलभट्टी ६५, कोसमी ६३, सावरगाव ५६, पन्नेमारा ६०, कटेझरी ८०, चारवाही ५५, तुमळीकसा येथे ४२ टक्के मतदान झाले. मृत्यू झालेले नागरिक, लग्न होऊन दुसºया गावी गेलेल्या महिला यांची नावे मतदार यादीत होती. मात्र ज्या नवीन मतदारांनी नोंदणी केली. त्यांचे नाव मात्र यादीत नसल्याचे दिसून येत होते. परिणामी मतदानाची आकडेवारी घटली असल्याचे दिसून येते.
सिरकोंडातील केवळ १६ जणांनी केले मतदान
बामणी - बामणी परिसरातील रोमपल्ली येथे मतदान केंद्र होते. या मतदान केंद्रावर सिरकोंडा गावातील नागरिकांचे मतदान होते. सिरकोंडा ते रोमपल्ली या दोन गावांमधील अंतर ७ किमी आहे. त्यामुळे बहुतांश मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविली. सिरकोंडा गावातील केवळ १६ मतदारांनी मतदान केले.
जिमलगट्टा परिसरात उत्स्फूर्त मतदान
जिमलगट्टा - येथील मतदान केंद्रावर एकूण १ हजार १०० मतदार होते. त्यापैकी ८४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिमलगट्टा परिसरातील रसपल्ली मतदान केंद्रावर ४९० पैकी ६४४ मतदारांनी मतदान केले. टक्केवारी ८१.१२ टक्के एवढी आहे. अर्कापल्ली मतदान केंद्रावर ७६.४४ टक्के मतदान झाले. ६७६ पैकी ५२१ मतदारांनी मतदान केले. इष्टापूर येथे ७५.७३ टक्के मतदान झाले. ७९६ पैकी ६०० मतदान झाले. गोविंदगाव येथे ८१.५९ टक्के मतदान झाले. ८२९ मतदारांनी मतदान केले.
डोक्यावर छत्री घेऊन मतदानाचा हक्क बजावला
महागाव - अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे दुपारी २ वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. मतदार छत्र्या घेऊन रांगेत उभे होते.


पावसामुळे तारांबळ
मतदानाची वेळ सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंतच होती. पण त्यानंतरही मतदारांच्या रांगा बहुतांश केंद्रांवर लागल्या होत्या. ३.४५ वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरात जोरदार पाऊस सुरू झाला. अचानक आलेल्या पावसामुळे मतदारांची धांदल उडाली. बहुतांश मतदान केंद्र नगर परिषदेच्या शाळांमध्ये होते. यावेळी मतदारांनी शाळेच्या खोल्यांचा आसरा घेतला.

१३ किमीचा प्रवास करीत बजावला मतदानाचा हक्क
घोट : गडचिरोली उपविभागांतर्गत येणाºया रेगडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील मौजा वेंगणूर (ता.मुलचेरा) येथील मतदान केंद्र सुरक्षेच्या कारणास्तव मौजा रेगडी येथे हलविण्यात आले. नागरिकांनी १३ किमी अंतर पार करून तसेच नाल्यातून डोंग्याने प्रवास करून मतदानाचा हक्क बजाविला.नक्षलवाद्यांनी पोस्टर व बॅनरच्या माध्यमातून ग्रामस्थांना मतदानावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. मात्र वेंगणूरवासीयांनी त्या आवाहनाला न जुमानता उत्स्फूर्तपणे घराबाहेर पडत १३ किमीच्या जंगलातून तसेच वाटेत लागणाºया कन्नमवार जलाशयाच्या नाल्यातून बोटीने प्रवास करून रेगडीचे मतदान केंद्र गाठले आणि आपला मतदानाचा हक्क बजावला. काही नागरिकांनी दुचाकी तर काहींनी सायकलने नाल्यापर्यंत प्रवास केला.मतदान केंद्रावर पोलीस दलातर्फेत्या ग्रामस्थांचे रेगडी पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी खापरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आपली भावना व्यक्त करताना त्या ग्रामस्थांनी आपला नेहमीच लोकशाहीला पाठिंबा असून नक्षलवाद्यांच्या भूलथापांना आपण बळी पडणार नाही, असे सांगितले. यामध्ये महिला व वृद्धांचाही सहभाग होता. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनीही त्या गावकऱ्यांचे कौतुक केले.

Web Title: Maharashtra Election 2019 : Future EVMs of 37 candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.