शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

Maharashtra Election 2019 ; उमेदवारांचे लक्ष ग्रामीण भागावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2019 6:00 AM

खासदार अशोक नेते यांनी गुरूवारी पत्रपरिषद घेऊन जिल्ह्यात भाजप विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती देऊन पुन्हा राज्यात भाजप सरकार आल्यास यापेक्षाही जास्त कामे होतील, असे सांगितले. सोबतच जिल्ह्यात भाजपचे तीनही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

ठळक मुद्देमॅरेथॉन दौरे सुरू : शहरी भागात सामसूम, फलक-पोस्टरबाजीही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या १० दिवसांपासून दुर्गोत्सवाच्या धामधुमीत असणारे विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते दुर्गा विसर्जनानंतर गुरूवारी मोकळे झाले. यासोबतच उमेदवारही गावोगावी प्रचार करण्यासाठी सज्ज झाले. काही प्रमुख उमेदवारांनी सध्या ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत करत गावे पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. परंतू शहरी भागात मात्र प्रचाराचा लवलेश नसल्यामुळे सर्वत्र सामसूम आहे. अद्याप कोणत्याही उमेदवाराचे फलकसुद्धा नजरेस पडणे दुर्मिळ झाले आहे.कमी वेळेत जास्त गावे पालथी घालण्याच्या नादात उमेदवारांचा मॅरेथॉन प्रचार सुरू आहे. सकाळी घराबाहेर पडल्यानंतर रात्रीपर्यंत गावोगावी भेटी देऊन कॉर्नरसभा किंवा गावपुढाऱ्याच्या घरी मतदारांच्या भेटीगाठी घेऊन ‘मीच तुमचा तारणहार’ हे सांगण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून सुरू आहे. यात गावपुढाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहे.जिल्ह्यात राष्ट्रीय पातळीवरील मोठ्या नेत्यांच्या सभा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. मात्र काँग्रेस आणि भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांच्या दौºयांचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी हेलिपॅडपासून तर विविध परवानग्यांसाठी पक्षीय यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे.विकासाच्या मुद्यावर निवडणूकखासदार अशोक नेते यांनी गुरूवारी पत्रपरिषद घेऊन जिल्ह्यात भाजप विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती देऊन पुन्हा राज्यात भाजप सरकार आल्यास यापेक्षाही जास्त कामे होतील, असे सांगितले. सोबतच जिल्ह्यात भाजपचे तीनही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. या पत्रपरिषदेला नगराध्यक्ष योगिता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, डॉ.भारत खटी, गोविंद सारडा, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते. मात्र यावेळी भाजपचे कोणीही उमेदवार उपस्थित नव्हते.कोणाचे नाव कोणत्या नंबरवर याची उत्सुकतासर्व उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर मतदार यंत्रावरील मतपत्रिकेवर त्यांचे नाव कोणत्या क्रमांकावर राहणार हे सांगण्यात आले. निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसार राष्ट्रीय, राज्य आणि नोंदणीकृत पक्ष तथा अपक्ष अशा क्रमाने उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली. मतदारांना आपले नाव कोणत्या क्रमांकावर आहे हे ठळकपणे लक्षात यावे यासाठी उमेदवारांकडून डमी मतपत्रिका छापून त्याचेही घरोघरी वाटप करण्यास गुरूवारी सुरूवात झाली.अहेरीत ‘वंचित’चा उमेदवारच वंचितपक्षीय नेत्यांच्या प्रचारात गुरूवारी वंचित बहुजन आघाडीने पहिली सभा घेतली. पक्षाचे नेते अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या या सभेला गडचिरोली आणि आरमोरीतील उमेदवार हजर असले तरी अहेरीचे उमेदवार अ‍ॅड.लालसू नागोटी अनुपस्थित होते. उमेदवारच नसल्यामुळे त्यांच्या मतदार संघातील श्रोतेही नव्हते. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याची सभा असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे मतदार नेत्याच्या मार्गदर्शनापासून वंचित राहिल्याने हा चर्चेचा विषय होता.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली