शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Maharashtra Election 2019 ; गडचिरोली-आरमोरीचा गड राखण्यात भाजपला यश, अहेरीत राष्ट्रवादीची मुसंडी, पराभवाचा वचपा काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 6:00 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना अहेरी मतदार संघातील नागरिकांनी आपला प्रतिनिधी निवडताना गेल्या १० पदापासूनचा त्यांचा विजनवास दूर केला. त्यामुळे अहेरीत या विजयानंतर चांगलाच जल्लोष करण्यात आला. धर्मरावबाबा यांना आलापल्ली क्षेत्रातून अनपेक्षितपणे चांगली आघाडी मिळाली आहे.

डॉ.देवराव होळी, कृष्णा गजबेंचा दणदणीत विजयअटीतटीच्या तिहेरी लढतीत अम्ब्रिशराव आत्राम यांचा पराभव१० वर्षानंतर धर्मरावबाबांच्या हाती पुन्हा अहेरीची सूत्रेमंत्रीपद मिळेल का? जिल्हावासीयांचे लक्षलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा निवडणुकीचे निकाल गुरूवारी जाहीर झाले. गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघातील निकाल भाजपच्या बाजुने लागून विद्यमान आमदार अनुक्रमे डॉ.देवराव होळी आणि कृष्णा गजबे यांना मतदारांनी कौल दिला. मात्र अहेरीत माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार अम्ब्रिशराव यांचा पराभव जिव्हारी लागला. या अनपेक्षित पराभवामुळे राजेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांना मोठा हादरा बसला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना अहेरी मतदार संघातील नागरिकांनी आपला प्रतिनिधी निवडताना गेल्या १० पदापासूनचा त्यांचा विजनवास दूर केला. त्यामुळे अहेरीत या विजयानंतर चांगलाच जल्लोष करण्यात आला.धर्मरावबाबा यांना आलापल्ली क्षेत्रातून अनपेक्षितपणे चांगली आघाडी मिळाली आहे. त्यामुळे विजयी रॅलीची सुरूवात आलापल्लीतून काढण्यात आली. या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशस्तरीय युवा नेते ऋतुराज हलगेकर, बांधकाम सभापती भाग्यश्री आत्राम, जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर, प्रशांत कुत्तरमारे, बबलू हकीम, शाहीन हकीम आदींसह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते.अहेरीतील तिहेरी मुकाबल्यात सर्वाधिक ६० हजार १३ मते धर्मरावबाबा यांना, अम्ब्रिशराव आत्राम यांना ४४ हजार ५५५ तसेच दीपक आत्राम यांना ४३ हजार २२ मते मिळाली. गडचिरोलीत डॉ.देवराव होळी यांना ९७ हजार ९१३, डॉ.चंदा कोडवते यांना ६२ हजार ५७२ तर वंचित बहुजन आघाडीचे गोपाल मगरे यांना ६७३५ मते मिळाली. आरमोरीत कृष्णा गजबे यांनाा ७५ हजार ७७, आनंदराव गेडाम यांना ५३ हजार ४१० तर सुरेंद्रसिंह चंदेल यांना २५ हजार २७ मते मिळाली.ईव्हीएमने वाढविले टेन्शनमतमोजणीदरम्यान गडचिरोली विधानसभा मतदार संघातील मतमोजणीचे निकाल बाहेर येण्यास वेळ लागत होता. त्यामुळे बाहेर निकालासाठी ताटकळत असलेल्या नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचे टेन्शन वाढत होते.एका इव्हीएममध्ये थोडा तांत्रिक बिघाड येऊन ईव्हीएम काम करत नसल्यामुळे पुढील फेरीचे निकाल थांबून गेले होते. तो तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतरच आणि त्यातील मतांची नोंद घेतल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे निकालाच्या प्रक्रियेत थोडी अडचण आली होती.अन् अहेरीत बाजी पलटलीअटितटीच्या अहेरी मतदार संघात कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वाधिक होती. त्यानुसार पहिल्या ६ ते ७ फेऱ्यांमध्ये अम्ब्रिशराव आत्राम आणि दीपक आत्राम यांना आघाडी मिळत होती. पण आठव्या फेरीपासून बाजी पलटली.आठव्या फेरीनंतर धर्मरावबाबा यांनी आघाडी घेतली. सुरूवातीला अतिशय कमी फरक असला तरी फेरीगणिक हा फरक वाढत गेला. त्यामुळे अहेरीत अम्ब्रिशराव यांच्या महलवर निराशा तर धर्मरावबाबांच्या वाड्यावर जल्लोषाला सुरूवात झाली.उमेदवारांना शेवटपर्यंत आशासाधारण पहिल्या फेरीपासून सर्व प्रमुख उमेदवार मतमोजणीच्या ठिकाणी ठाण मांडून बसले होते. निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पराभवाच्या छायेतील उमेदवार काढता पाय घेतील अशी शक्यता होती. परंतू त्यांची आशा शेवटपर्यंत कायम होती.उमेदवारांसोबत त्यांचे समर्थक, कार्यकर्ते मतमोजणी केंद्राबाहेर निकालाच्या उद्घोषणेकडे कान लावून दिवसभर प्रतीक्षा करत होते. गडचिरोलीत मुख्य रस्त्यावर बसण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. त्यामुळे संध्याकाळपर्यंत आयटीआयसमोरील रस्ता माणसांनी गजबजून गेला होता.या निकालांची ठळक वैशिष्ट्ये काय?या निकालाने जिल्ह्यावर भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आणि प्रभाव कायम असल्याचे दाखवून दिले.ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी किशन नागदेवे यांच्याकडे सोपविली. पण ती त्यांनी समर्थपणे पेलून दाखविली.काँग्रेस पक्षाने तीनही जागी उमेदवार उभे केले होते. पण एकाही जागी यश आले नाही. काँग्रेसला आत्मपरिक्षण करण्याची गरज व्यक्त होत आहे.आनंदराव गेडाम दोन वेळा आमदार राहिले आहे. अपक्ष उमेदवाराच्या कथित अपहरणाने त्यांना शेवटच्या दिवसात प्रचारापासून दूर राहावे लागले. त्याचाही फटका त्यांना बसला.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली