शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

एमए शिकलेली किरण बनली टॅक्सी ड्रायव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 07:00 IST

अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेली सिरोंचा तालुक्यातील डोंगराळ भागावर असलेल्या रेगुंठा येथील २३ वर्षीय युवती किरण रमेश कुर्मा ही स्वत:चे प्रवासी वाहन चालवून उदरनिर्वाहासाठी कुटुंबाला हातभार लावत आहे.

ठळक मुद्देरेगुंठाची युवती चालविते प्रवाशी जीपगाडीपाच वर्षांपासून सेवा

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेली सिरोंचा तालुक्यातील डोंगराळ भागावर असलेल्या रेगुंठा येथील २३ वर्षीय युवती किरण रमेश कुर्मा ही स्वत:चे प्रवासी वाहन चालवून उदरनिर्वाहासाठी कुटुंबाला हातभार लावत आहे. तिने दाखविलेली ही हिंमत इतर बेरोजगार युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

हलाखीच्या परीस्थितीचा सामना करीत किरण हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून शिक्षण घेत होती. मात्र नोकरीसाठी संघर्ष करणे शक्य होणार नाही, ही बाब लक्षात आल्यानंतर तिने वडिलाला टॅक्सीच्या व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला. मागील पाच वर्षांपासून ती चारचाकी टॅक्सी (जीप) चालवत आहे.रेगुंठा ते सिरोंचादरम्यान किरण व तिच्या वडिलांच्या टॅक्सी चालतात. हा ६० किमीचा मार्ग घनदाट जंगलाने व्यापलेला व दऱ्याखोऱ्यांचा आहे. मात्र किरण न डगमगता वेगात आपली टॅक्सी पुढे हाकते. स्वत:ची कार चालविताना अनेक महिला पहायला मिळतात. मात्र प्रवाशी वाहन चालविणारी किरण ही गडचिरोली जिल्ह्यातील पहिली महिला चालक असावी.

लोकमतने तिला विचारले असता, या व्यवसायात युवतींना कोणतीही अडचण नाही. त्यामुळे इतर व्यवसायांप्रमाणेच युवतींनी सुध्दा या व्यवसायात उतरून स्वत:ला सिध्द केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया तिने दिली.

तीन टॅक्सींची आहे मालककिरणने वडिलाला व्यवसायात साथ दिल्यामुळे टॅक्सीचा व्यवसाय आणखी बहरला. किरणने टॅक्सी चालवायला सुरूवात केली तेव्हा पाच वर्षांपूर्वी त्यांच्याकडे केवळ एकच टॅक्सी होती. मात्र किरणने या व्यवसायातून आणखी दोन टॅक्सी खरेदी केल्या. आज ती तीन टॅक्सींची मालक आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक