शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम, पळून जाऊन लग्न, संशयकल्लोळ आणि शेवटी पत्नीचा गळफास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 11:38 IST

जयनगरातील घटना : दोन चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी: प्रेयसी अल्पवयीन असतानाच तिला पळवून नेत बाहेरगावी संसार थाटला. मुलीच्या आई-वडिलांनी अकांडतांडव करून पोलिसांत केस केली. प्रियकरावर गुन्हा दाखल झाला. आई-वडिलांचे काळीज. अखेर केस मागे घेतली. मुलीच्या संसारवेलीवर अपत्यरूपी दोन फुले उमलली; पण दहा वर्षाच्या संसाराला कुणाची दृष्ट लागली. पती-पत्नीत संशयकल्लोळ माजला. पतीचे कथित विवाहबाह्य संबंध पत्नीला सहन झाले नाही. अन् तिने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. ही हृदयद्रावक घटना जयनगर येथे गुरुवार, १५ मे रोजी पहाटे उघडकीस आली.

संगीता श्रीनिवास सरकार (२८, रा. विजयनगर), असे मृत विवाहितेचे नाव आहे. जयनगर येथील संगीता गणेश मंडल हिचे विक्रमपूर येथील श्रीनिवास गिरेन सरकार (३४) या तरुणासोबत २०१३ मध्ये लग्न झाले. अल्पवयात मुलीला पळवून नेल्याची तक्रार गणेश मंडल यांनी श्रीनिवास यांच्याविरोधात चामोर्शी ठाण्यात दिली होती. त्यांच्या तक्रारीवरून श्रीनिवासविरोधात गुन्हा दाखल झाला. काही दिवस ते दोघेही फरार होते. संगीताच्या आई-वडिलांचा राग शांत झाल्यानंतर ते परतले. श्रीनिवासला अटक झाली. १८ दिवसांचा कारावासही झाला. अखेर संगीताच्या आई वडिलांनी केस मागे घेतली. श्रीनिवासला जामीन मिळाला. दोघेही विजयनगर येथे सुखाने संसार करीत होते. दरम्यान, त्यांच्या संसारवेलीवर ब्रावन व श्रेयशी ही दोन अपत्यरूपी फुले उमलली. 

संसार झाला उद्ध्वस्तकाही वर्षांनी श्रीनिवास हा ठेकेदारीच्या कामानिमित्त पत्नी व दोन मुलांसह एटापल्ली येथे राहत होता. याचवेळी श्रीनिवासचे एटापल्ली येथील एका महिलेशी विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचा संशय संगीताने घेतला. यावरून दोघांत वारंवार भांडणे व्हायची. दरम्यान, ती माहेरी जयनगर येथे आली. १४ मे रोजी कुटुंबातील सर्व सदस्य झोपी गेल्यानंतर तिने आष्टी रोडलगतच्या आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. ही घटना गुरुवारी पहाटे ३:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अमुल कादबाने यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राधा शिंदे, पोलिस नाईक अतुल मडावी करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGadchiroliगडचिरोली