शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

Lok Sabha Election 2019; घटक पक्षांना सोबत घेण्याची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 10:10 PM

लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी अर्ज वैध ठरलेले उमेदवार प्रचारासाठी मोकळे झाले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांचे अस्तित्व स्वतंत्र असले तरी आघाडी आणि युतीमधील आपापल्या मित्रपक्षांचा योग्य तो फायदा घेण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवारांकडून केला जात आहे.

ठळक मुद्देप्रचारात महत्त्वाचे स्थान : आघाडी आणि युतीमधील पदाधिकाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवारी अर्ज वैध ठरलेले उमेदवार प्रचारासाठी मोकळे झाले आहेत. निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेस आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांचे अस्तित्व स्वतंत्र असले तरी आघाडी आणि युतीमधील आपापल्या मित्रपक्षांचा योग्य तो फायदा घेण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवारांकडून केला जात आहे. त्यासाठी त्या मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष काळजी घेतली जात असून हे करताना उमेदवारांना थोडी कसरतही करावी लागत आहे.गेल्या दोन लोकसभा निवडणुकीतील मतांचे प्रमाण पाहता गडचिरोली-चिमूर मतदार संघात काँग्रेस आणि भाजप अशीच सरळ झाल्याचे दिसून येते. यावेळची निवडणूकही त्यासाठी अपवाद नाही. उलट यावेळी इतर पक्षीय उमेदवारांचे अस्तित्व नगण्य राहून आघाडी-युती अशी थेट लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. त्यामुळे आघाडी व युतीमधील घटक पक्षांचे महत्व अधिक वाढले आहे.काँग्रेस महाआघाडीतील प्रमुख घटक पक्षांमध्ये राष्टÑवादी काँग्रेस, शेकाप, पीरिपा (कवाडे), रिपाइं (गवई) या पक्षांचे अस्तित्व जिल्ह्यात आहे. तर भाजपच्या युतीमध्ये शिवसेना आणि रिपाइं (आठवले) हे प्रमुख पक्ष आहेत. या सर्व पक्षांच्या पदाधिकाºयांची दोन्ही पक्षांकडून खास सरबराई केली जात आहे. बॅनर, पोस्टरवर त्यांचे फोटोही झळकत आहेत. एवढेच नाही तर स्टेजवर किंवा बैठकांमध्ये त्यांना मानाचे स्थान दिले जात आहे.कोणत्याही कारणामुळे घटक पक्षांचे पदाधिकारी दुखावले जाणार नाही, किंवा आम्हाला डावलले, महत्व दिले नाही अशी भावना त्यांच्यात येऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. त्यामुळे या पदाधिकाºयांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत.शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी शिवसेना सोडली असली तरी त्यांचे कुरखेडा भागातील अस्तित्व पाहून भाजपने त्यांनाही जवळ केले आहे. सोमवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशीही त्यांची भेट घालून देण्यात आली. यावरून भाजप कोणतीही कसर सोडण्यास तयार नसल्याचे दिसून येते. काँग्रेस आघाडीत घटक पक्षांची संख्या जास्त असल्याने त्यांना पदाधिकाºयांना सांभाळताना जास्त कसरत करावी लागणार आहे.६ उमेदवारांचे अर्ज वैध, माघारीसाठी दोन दिवसनिवडणूक रिंगणात उतरण्यासाठी सोमवारपर्यंत १० उमेदवारांनी १८ अर्ज दाखल केले होते. छाननीत त्यापैकी ४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून ६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. वैध नामांकनांमध्ये अशोक नेते (भारतीय जनता पार्टी), डॉ.नामदेव उसेंडी (भारतीय राष्टÑीय काँग्रेस), डॉ.रमेशकुमार गजबे (वंचित बहुजन आघाडी), हरिचंद्र मंगाम (बहुजन समाज पार्टी), देवराव नन्नावरे (आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया) आणि डॉ.नामदेव किरसान (अपक्ष) यांचा समावेश आहे. निवडणुकीतून माघार घेण्यासाठी २८ मार्चपर्यंत (दोन दिवस) मुदत आहे.नामदेव किरसान यांच्या उमेदवारीने वाढविले काँग्रेसने टेन्शनलोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या चार प्रमुख उमेदवारांमध्ये डॉ.नामदेव किरसान हे एक प्रबळ दावेदार होते. त्यांनी जनसंपर्क यात्रा काढून निवडणूकपूर्व प्रचारही सुरू केला होता. पण त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपली उमेदवारी दाखल करून बंड पुकारले आहे. त्यांची उमेदवारी निवडणुकीत कायम राहिल्यास काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचे टेन्शन वाढणार आहे. त्यामुळे किरसान यांची पक्षाकडून समजूत काढून त्यांना माघार घेण्यास भाग पाडले जाते, की त्यांची उमेदवारी कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक