शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

निवडणूक प्रचारातून स्थानिक मुद्दे गायब; शेवटच्या टप्प्यात प्रचाराला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 15:53 IST

रणधुमाळी : सत्ताधाऱ्यांकडून योजनांचे मार्केटिंग, विरोधकांकडून महागाईवर बोट

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात तीन विधानसभा मतदारसंघांत प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप- प्रत्यारोप, बैठका, फेऱ्या, जाहीर सभांमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रमुख उमेदवारांसह स्टार प्रचारकांकडून राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मुद्यांनाच ढाल बनवले जात आहे. सत्ताधाऱ्यांचा भर योजनांच्या प्रचार, प्रसारावर दिसतो तर विरोधकांकडून महागाईसारख्या प्रश्नांवर बोट ठेवले जात आहे.

आरमोरी, गडचिरोली, अहेरी मतदारसंघांत यंदा अटीतटीची लढत आहे. मातब्बर नेत्यांसह नवख्यांचा कस लागला आहे. यानिमित्ताने शहरासह गावखेड्यांमध्ये राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रचाराचा धुरळा उडत आहे, जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे आहे. शिवाय दुर्गम, अतिदुर्गम गावांचा समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचताना उमेदवारांची अक्षरशः धावपळ उडत आहे. स्टार प्रचारकांसह दिग्गज नेत्यांच्या सभा घेऊन वातावरण अधिक पोषक करण्यावर सर्वच उमेदवारांचा भर असल्याचे पहावयास मिळत आहे.

रुसवे-फुगवे संपेनात; कोणाला बसणार फटका ? निवडणूक शेवटच्या टप्प्यात असतानाही महायुती व महाविकास आघाडातील रुसवे-फुगवे काही संपायला तयार नाहीत. मित्रपक्षांचे काही पदाधिकारीही प्रमुख उमेदवारांसोबत दिसत नाहीत. त्याचा फटका कोणाला बसतो, त्यांची ऐनवेळी काय भूमिका राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

अहेरी क्षेत्रात जोरदार रस्सीखेचअहेरी मतदारसंघातील लढत अधिक चर्चेत आहे. एकेका मतासाठी तेथे जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दिग्गज नेत्यांच्या भवितव्याचा फैसला करणाऱ्या या निवडणुकीकडे विदर्भाचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेले आहे. फोडाफोडी, आरोप-प्रत्यारोप व व्हिडीओ-ऑडिओ वॉर यामुळे तेथील राजकीय वातावरण अधिक गरम आहे

शेवटच्या टप्प्यात प्रचाराला वेगप्रचारासाठी जेमतेम पाच दिवस शिल्लक आहेत. महाविकास आघाडी, महायुतीत बंडखोरी काहींना अडचणीची, काहींना सोयीची झाली आहे. अशा परिस्थितीत शेवटच्या टप्प्यात कोण कोणाची मते खेचतो, कुठले मुद्दे अधिक चर्चेत येतात, लोकांची मने कोण कशा पद्धतीने वळवतो यावर बरेच गणित अवलंबून राहणार आहे.

हे मुद्दे अधिक चर्चेत

  • लाडकी बहीण योजना
  • शेतकरी सन्मान योजना 
  • महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास
  • ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास
  • अयोध्येत राम मंदिर उभारणी 
  • संविधान बदलाची चर्चा
  • जातनिहाय जनगणना 
  • ओबीसी आरक्षण
  • आदिवासींच्या आरक्षणातील घुसखोरी 
  • हिंदुत्ववाद 
  • शहरी नक्षलवाद

कोणत्या प्रमुख मुद्यांना प्रचारात बगल

  • वनहक्क पट्ट्यांचा मालकी हक्क
  • गडचिरोलीतील बाह्यवळण रस्त्याचे रुंदीकरण 
  • पूरग्रस्त भागातील गावांचे स्थलांतर 
  • पूर व्यवस्थापन आराखडा 
  • अभियांत्रिकी, विधी महाविद्यालय निर्मिती
  • अहेरी, सिरोंचात उच्चशिक्षण सुविधा 
  • सिंचनासाठी नवे प्रकल्प 
  • वनउपजावर आधारित उद्योगांना चालना 
  • पर्यटन विकास 
  • कौशल्य शिक्षणाच्या संधी 
  • रोजगारासाठी उद्योग निर्मिती
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४VotingमतदानGadchiroliगडचिरोली