शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

पट्टेधारक सातबारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 00:11 IST

वननिवासी वनहक्क अधिनियम २००६ अंतर्गत तालुक्यातील रामपूर चेक येथील वनजमिनीवरील अतिक्रमणधारक शेतकºयांना २६ डिसेंबर २०१७ ला वनहक्क पट्टे मंजूर झाले. परंतु नऊ महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापही सातबारा उपलब्ध करून देण्यात आला नाही.

ठळक मुद्देअतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी : रामपूर चेक येथील शेतकऱ्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : वननिवासी वनहक्क अधिनियम २००६ अंतर्गत तालुक्यातील रामपूर चेक येथील वनजमिनीवरील अतिक्रमणधारक शेतकºयांना २६ डिसेंबर २०१७ ला वनहक्क पट्टे मंजूर झाले. परंतु नऊ महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापही सातबारा उपलब्ध करून देण्यात आला नाही. येथील २१ शेतकरी सातबारापासून वंचित आहेत. सदर शेतकऱ्यांना त्वरित सातबारा वितरित करावा, अशी मागणी शेतकºयांनी अपर जिल्हाधिकारी दामोधर नान्हे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.रामपूर चेक येथील २१ शेतकऱ्यांना २६ डिसेंबर २०१७ ला वनहक्क पट्टे मंजूर झाले. त्यानंतर मे २०१८ ला वनहक्क पट्टे प्राप्त झाले. परंतु अद्यापही तलाठी साजाला सातबारा व नमुना आठ-अ व पट्ट्याची नोंद घेऊन खतावणी करण्यात आली नाही. वनहक्क पट्टे मंजूर होऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटला. परंतु अद्यापही कार्यवाही झाली नाही. प्रशासनाच्या सूचनेनुसार मंजुरी मिळाल्यानंतर तसेच वनहक्क पट्टे प्राप्त झाल्यानंतर तीन महिन्यानंतर साजाला नोंद घेणे आवश्यक आहे. परंतु या कार्यवाहीला विलंब होत आहे. परिणामी शेतकºयांना सातबारावर मिळणारे पीजकर्ज तसेच इतर योजनांचा लाभ घेता येत नाही. वरिष्ठ स्तरावरून कार्यवाही करून २१ वनहक्क पट्टेधारकांना सातबारा मिळवून द्यावे तसेच तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यांना निर्देशीत करावे, अशी मागणी शेतकरी लिंगा बाकीवार, रामुलू कुळमेथे, शंकर पंदीलवार, लीलाबाई मोहुर्ले, गजानन पानेमवार, म्हैसुबाई गोमासे, मल्ला मंचर्लावार, लालू भट्टीवार, येल्लुबाई संदारपवार, जयाबाई ठाकरे, भीमा गौरारपवार, मंजूळा चांदेकर, रामय्या जनार्धन, पेंटा पानेमवार, तुळशिराम गोवर्धन, पोच्चा पानेमवार, राजू भट्टीवार, मल्ला बद्दीवार, रामा बद्दीवार, लचमा टेकुलवार, अमक्का चांदेकर यांनी केली आहे.सात वर्षांपासून समस्या प्रलंबितवनहक्क कायद्यानुसार २०११ मध्ये जिल्ह्यात अनेक पारंपरिक वननिवासी व इतर अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना वनहक्क पट्ट्यांचे वितरण करण्यात आले. वैयक्तिक व सामूहिक दावे शेतकऱ्यांना प्राप्त झाले. परंतु अद्यापही शेतकऱ्यांना सातबारा अथवा नमुना आठ-अ ची नोंद तलाठी साजात घेण्यात आली नाही. तसेच ते वितरित सुद्धा करण्यात आले नाही. परिणामी पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळण्यासही अडचणी येत आहेत. शेतकरी भरपाईपासून सुद्धा वंचित आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी