लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमाल खरेदीचा शुभारंभ रविवारी करण्यात आला.यावेळी खा.अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, आ.डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेविका पूजा बोबाटे, जिल्हा उपनिबंधक खाडे, जि.प.सदस्य अतुल गण्यारपवार, शशिकांत साळवे, अविनाश पाल, घिसुलाल काबरा, गडचिरोेली बाजार समितीचे मुख्य प्रशासक नितीन मस्के, अमिश निमजे, रमेश सारडा, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना खा.अशोक नेते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२० पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार बाजार समित्यांना सक्षम करण्याचे काम सुरू झाले आहे, असे प्रतिपादन केले.प्रास्ताविक कृउबास समितीचे सचिव नरेंद्र राखडे, संचालन लीलाधर भरडकर यांनी केले. यशस्वीतेसाठी कृउबासच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले.
गडचिरोली बाजार समितीत धान खरेदीचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:49 IST