लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगर पालिका कार्यालयात नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते महात्मा गांधी व संत गाडगेबाब यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून स्वच्छता हीच सेवा या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.१५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधीत स्वच्छतेवर राष्टÑव्यापी मोहीम नगर परिषदेतर्फे राबविण्यात येत आहे. शुभारंभाप्रसंगी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शिक्षण सभापती अॅड. नितीन उंदीरवाडे, महिला व बाल कल्याण उपसभापती वैष्णवी नैताम, नगरसेविका रितू कोलते, अनिता विश्रोजवार, लता लाटकर, सतीश विधाते, निता उंदीरवाडे, मंजुषा आखाडे, मुक्तेश्वर काटवे, रंजना गेडाम, पुजा बोबाटे, गीता पोटावी, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गणेश ठाकरे यांनी केले. यावेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी स्वच्छतेच्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगून महत्त्व पटवून दिले.
स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:16 IST
स्थानिक नगर पालिका कार्यालयात नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते महात्मा गांधी व संत गाडगेबाब यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून स्वच्छता हीच सेवा या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ
ठळक मुद्देपालिकेचा पुढाकार : पदाधिकारी व कर्मचाºयांनी घेतली सफाईची शपथ