शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

शेवटचा माणूस हा विकासाचा केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 23:45 IST

विकासाचा केंद्रबिंदू हा शेवटचा माणूस, अर्थात आपला ‘आम आदमी’ आहे. लोककल्याणाच्या विविध योजनांमधून विकासाची गंगा अशाच पध्दतीने पुढे नेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक उईके यांनी केले.

ठळक मुद्देआदिवासी विकासमंत्र्यांची ग्वाही : लोककल्याणाच्या योजनांमधून विकासाची गंगा पुढे नेण्यासाठी कटीबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विकासाचा केंद्रबिंदू हा शेवटचा माणूस, अर्थात आपला ‘आम आदमी’ आहे. लोककल्याणाच्या विविध योजनांमधून विकासाची गंगा अशाच पध्दतीने पुढे नेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ.अशोक उईके यांनी केले. स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय ध्वजारोहण व सत्कार कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.गुरूवारी डॉ.उईके यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर विविध विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळयाला खासदार अशोक नेते, जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, आमदार डॉ.देवराव होळी, नगराध्यक्ष योगिता पिपरे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड यांच्यासह इतर पदाधिकारी, अधिकारी, नागरीक उपस्थित होते.यावेळी डॉ.उईके यांनी गडचिरोली जिल्हयातील विविध विकास कामांची माहिती त्यांनी जनतेसमोर ठेवली. जिल्हयातील ३५,३३१ शेतकºयांना १०० कोटी १९ लक्ष रूपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे. शेतीविषयक उत्पन्नात वाढ करण्यासाठी कर्ज स्वरूपात २० हजार ५९ शेतकºयांना ८४ कोटी २८ लाखांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. शबरी घरकुल योजनेतून २०१५-१६ पासून आजपर्यंत ९४८ घरकुलांचा लाभ देण्यात आला. आदिम जमाती घरकुल योजनेतून ३०० घरकुलांचा लाभ देण्यात आला. आता आदिम जमाती घरकुल योजनेचा लक्ष्यांक ५०० करण्यात आला आहे. १९९२ साली सुकथनकर समितीने राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासी विकासाकरीता ९ टक्के निधीची तरतूद द्यावी अशी शिफारस केली. २०१४ ला मुख्यमंत्र्यांंच्या नेतृत्वात ९ टक्के निधी आदिवासी विकासाकरीता देण्यास सुरूवात झाली. पेसाअंतर्गत येणाºया ग्रामपंचायतींना ५ टक्के निधी देण्यात येत आहे आणि हा भारतातील पहिला निर्णय ठरला आहे. यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा वाटा असल्याचे ते म्हणाले. संचालन क्र ीडा अधिकारी मदन टापरे यांनी तर आभार उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुबे यांनी मानले.सत्कारास पात्र ठरलेले अधिकारी-कर्मचारीध्वजारोहण कार्यक्र मानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाºयांचा आदिवासी विकासमंत्र्यांनी गौरव केला. यावेळी बहुतांश सत्कारार्थी आपापल्या भागातील ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने मंत्र्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारू शकले नाही.संत गाडगेबाबा अभियानासाठी धानोरा तालुक्यातील जांभळीचे रत्नमाला बावणे (सरपंच) व किशोर कुलसंगे (सचिव) यांना प्रथम, कुरखेडा तालुक्यातील अरततोंडीचे प्रियंका हलामी (सरपंच) व महेंद्र देशमुख (सचिव) यांना द्वितीय तर आरमोरी तालुक्यातील मानापूरचे धनीराम कुमरे (सरपंच) व वैशाली ढोरे (सचिव) यांना तृतीय क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.सत्कारास पात्र ठरलेल्यांमध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल एटापल्लीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार, गट्टाचे आरएफओ एम.एम.पाटील, सिरोंचाचे सहायक वनसंरक्षक एम.एम.गाजलवार यांचा समावेश होता.कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या कामात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हेडरीचे एसडीपीओ शशिकांत भोसले, सी-६० पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक नेताजी वडगर, गट्टाचे उपनिरीक्षक संदीप बोरकर, अहेरीचे उपनिरीक्षक सचिन जनक यांचा समावेश होता.मतदान केंद्राध्यक्ष, अधिकाºयांमध्ये शैलेंद्र अंबादे, स्वप्नील पाझारे, गणू गोरे, रुपेश नागदेवते, वामन पोरेटी, राहुल अंधार, पी.ए.गेडाम, अश्विन सोनुले, कपिलकुमार शर्मा, किशोर गोटा, एन.जे.पेंदोर, अलताब शेख, गिरीष तुलावी आदींचा समावेश होता. आदर्श तलाठी म्हणून आरमोरी तालुक्यातील देलोडाचे तलाठी पी.एम.धात्रक यांना सन्मानित करण्यात आले.आरोग्य विभागातील चांगल्या सेवेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, सहा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विनोद म्हशाखेत्री, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.सुनील मडावी आदींसह वेगवेगळ्या ठिकाणी सेवा देत असलेले डॉ.मिलिंद मेश्राम, डॉ.प्रमोद उंदीरवाडे, बेबी वड्डे, डॉ.अभिजित गादेवार, डॉ.भूषण लायवर, डॉ.भुवन मेश्राम, डॉ.राम लडके, डॉ.वागराज धुर्वे, आनंद मोडक यांचा सत्कार करण्यात आला.गोवर रूबेला लसीकरणासाठी लॉयन्स क्लबच्या अध्यक्ष संध्या लडके, अ‍ॅम्बेसेडर, एंजल देवकुले, तसेच सामाजिक वनीकरणातील कामगिरीसाठी जि.प.प्राथमिक शाळा ठाकरी, ता.चामोर्शी यांना शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने (५० हजार रुपये) सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :ministerमंत्रीPoliceपोलिस