शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

भूसुरुंग पेरणाऱ्या मट्टामीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, भामरागडच्या आरेवाडा जंगलात ठोकल्या बेड्या

By संजय तिपाले | Updated: November 25, 2024 20:58 IST

दरम्यान, यातील एका आरोपीला २४ नोव्हेंबरला पोलिसांनी भामरागडच्या आरेवाडा जंगलातून अटक केली. पांडु कोमटी मट्टामी (३५, रा. पोयारकोटी ता. भामरागड) असे त्या आरोपीचे नाव आहे.

 

गडचिरोली: अतिदुर्गम व नक्षलप्रभावित भामरागडच्या पर्लकोटा नदीच्या पुलाजवळ जमिनीत भूसुरुंग पेरुन जवानांचा घातपात करण्याचा कट १६ नोव्हेंबरला झाला होता. पोलिसांनी मोठ्या तत्परतेने माओवाद्यांचा  हा डाव उधळून लावला होता. दरम्यान, यातील एका आरोपीला २४ नोव्हेंबरला पोलिसांनी भामरागडच्या आरेवाडा जंगलातून अटक केली. पांडु कोमटी मट्टामी (३५, रा. पोयारकोटी ता. भामरागड) असे त्या आरोपीचे नाव आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिसंवेदनशील व माओवादग्रस्त गडचिरोलीत सुरक्षा यंत्रण अलर्ट मोडवर होती. अशातच मतदानाच्या चार दिवस आधी १६ नोव्हेंबरला भामरागड येथील पर्लकोटा नदीच्या पुलालगत  ताडगावला जोडणाऱ्­या मार्गावर स्फोटके जमिनीत पुरुन ठेवण्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी हेलिकॉप्टरने बॉम्ब शोधक व नाशक पथक तसेच सी- ६० जवान व राज्य राखीव दलाच्या जवानांना तेथे पाठवले.   शोध घेऊन पुरुन ठेवलेली स्फोटके घटनास्थळावर नियंत्रित स्फोटाद्वारे नष्ट करण्यात आले. एक क्लोमर व दोन स्फोटकांचा समावेश होता.  त्यामुळे मोठी दुर्घटना टळली होती. सुरक्षा दलाच्या जवानांना जिवे ठार मारुन त्यांची शस्त्रास्त्रे व दारुगोळा लुटण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी   भामरागड ठाण्यात भारतीय दंड संहितका कलम १०९, १३२, १२६ (२), १९० , १९१ (२) (३), ६१ (२) सह कलम भारतीय हत्यार कायदा कलम ४, ५ भारतीय स्फोटके कायदा तसेच देशविघातक कृती केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता.  या प्रकरणात पांडु मट्टामी याचे नाव समोर आले होते. तो भामरागड तालुक्यातील आरेवाडा जंगलात असल्याची माहिती मिळाल्यावरुन उपनिरीक्षक संकेत नानोटी यांच्या नेतृत्वातील पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या.    पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अहेरीचे अपर अधीक्षक श्रेणीक लोढा, भामरागडचे उपअधीक्षक अमर मोहिते, भामरागडचे पो.नि. दीपक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.  अभूतपूर्व शांततेत निवडणूक प्रक्रियादरम्यान, लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक देखील शांततेत पार पाडण्यात पोलिस यंत्रणेला यश आले. विधानसभेसाठी जिल्ह्यात तब्बल १६ हजार जवानांचा फौजफाटा तैनात होता. कोठेही अनुचित घटना घडली नाही. छत्तीसगड व तेलंगणा सीमावर्ती भागात पोलिसांनी राबविलेल्या नक्षलविरोधी अभियानासह हेलिकॉप्टर मुव्हमेंट तसेच अत्याधुनिक १३० ड्रोन कॅमेरे व यंत्रसामुग्री तसेच ७०० किलोमीटर रोड ओपनिंग या नियोजनामुळे नक्षल्यांचे मनसुबे उधळून लावण्यात पोलिस यशस्वी झाले. 

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीPoliceपोलिसnaxaliteनक्षलवादी