भूमिअभिलेख कार्यालय समस्यांचे आगार
By Admin | Updated: September 9, 2014 00:22 IST2014-09-09T00:22:15+5:302014-09-09T00:22:15+5:30
येथील तालुका निरिक्षक भूमिअभिलेख कार्यालयात विविध समस्या आवासून उभ्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना विविध अडचणीचा सामना करीत जनतेचे प्रश्न सोडवावे लागत आहे. या कार्यालयात २० पैकी ७ पदे

भूमिअभिलेख कार्यालय समस्यांचे आगार
लोमेश बुरांडे - चामोर्शी
येथील तालुका निरिक्षक भूमिअभिलेख कार्यालयात विविध समस्या आवासून उभ्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना विविध अडचणीचा सामना करीत जनतेचे प्रश्न सोडवावे लागत आहे. या कार्यालयात २० पैकी ७ पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामावरही परिणाम होत आहे.
१ आॅक्टोबर १९९४ ला तालुका भूमिअभिलेख कार्यालयाची स्थापना करण्यात आली. या कार्यालयांतर्गत तालुक्यातील २०४ गावांचा समावेश आहे. त्यानंतर उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाचे नव्याने नामकरण आॅगस्ट २०१० मध्ये करण्यात आले. या कार्यालयात कर्मचाऱ्यांची २० पदे मंजूर आहेत. त्यापैकी अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याची १३ पदे भरलेली आहे. सात पदे रिक्त आहेत. यामध्ये सिरस्तेदार १, मुख्य सहायक १, अभिलेखापाल १, प्रतिनिधी लिपीक १, नगर भूमापन लिपीक १, भूकरमापक १, शिपाई १ अशी पदे रिक्त आहेत. या कार्यालयाकरीता स्वतंत्र पिण्याच्या पाण्यासाठी विहिर किंवा हातपंप नाही. त्यामुळे खासगी विहिरीवरून पाणी दुरून पिण्यासाठी आणावे लागते. तसेच कार्यालयात शौचालय, बाथरूम व मुत्रीघराची व्यवस्था आहे. मात्र तेथे सर्वत्र घाण पसरली आहे.
संडास बाथरूमला दरवाजेही व्यवस्थीत नाही. पाण्याची सोय नसल्याने शौचालय व बाथरूममध्ये नळाचीही व्यवस्था नाही. कार्यालयात संगणक रूमची व्यवस्था नाही. इमारतीला बाहेरून संरक्षण भिंत नाही. खिडक्यांचे काच तुटलेले आहेत. इमारतीला ओलावा आला असून गेल्या काही वर्षांपासून रंगरंगोटीही झालेली नाही.
तसेच पावसाळ्याच्या दिवसात इमारतीच्या स्लॅबवर पाणी जमा होऊन ते खाली भिंतीवर झिरपते. त्यामुळे भिंतीही खराब झाल्या आहेत. या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था नाही.