शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

रेल्वेमार्गाच्या जमीन खरेदीकरिता लांजेडातील भूधारकांची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 10:31 PM

वडसा (देसाईगंज) ते गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामाने आता वेग घेतला आहे. प्रकल्पासाठी भूसंपादनाची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू झाली आहे. त्याअंतर्गत वाटाघाटीने जमीन खरेदी करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देभूसंपादन सुरू होणार : एसडीओ कार्यालयात आज वाटाघाटी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वडसा (देसाईगंज) ते गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामाने आता वेग घेतला आहे. प्रकल्पासाठी भूसंपादनाची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू झाली आहे. त्याअंतर्गत वाटाघाटीने जमीन खरेदी करण्यात येणार आहे. रेल्वेसाठी जमीन खरेदीकरिता लांजेडा येथील भूधारकांची सभा सोमवार दि.४ डिसेंबर रोजी गडचिरोली उपविभागीय अधिकारी कार्यालयात होणार आहे.गावकºयांच्या जमिनीला शासनाकडून किती भाव दिला जाणार, प्रकल्पग्रस्तांना इतर कोणकोणते फायदे होणार याची माहितीही यावेळी दिली जाणार आहे. मात्र शासनाने ठरविलेला दर गावकºयांना मान्य नसल्यास त्याबाबत वाटाघाटी करून गावकºयांची जमीन देण्यासाठी मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे.या रेल्वेमार्गासाठी ज्या व्यक्तींची जमीन खरेदी करावयाची आहे त्याचा मालकी हक्क अधिकार तपासून पाहण्याचे काम विधिज्ञांमार्फत पूर्ण झाले आहे. जमिनींच्या दर निश्चितीचे काम नगर रचना विभागाकडून करण्यात आले. आता वाटाघाटीव्दारे भूसंपादनाची प्रक्रिया वडसा तसेच गडचिरोली येथील उपविभागीय कार्यालयांमध्ये होणार आहे.दोन्ही उपविभागीय अधिकारी कार्यालयांमध्ये प्रकल्पग्रस्त लोकांच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.आज बैठकया रेल्वेमार्गात जमीन जाणाऱ्या मौजा लांजेडा येथील संबंधित भूधारकांची बैठक सोमवारी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे होणार आहे. त्या भूधारकांनी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.