चहाच्या आड खर्रा विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:01:23+5:30

कोरोना महामारीचे संकट टाळण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. शहरातील पानठेले बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. तरी शहरात सहजतेने खर्रा उपलब्ध होत आहे. सदर बाब लक्षात येताच शहरातील विविध ठिकाणातील विक्री होणाऱ्या दुकानांची झडती घेतली.

Kharra sale of tea | चहाच्या आड खर्रा विक्री

चहाच्या आड खर्रा विक्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नगर प्रशासनाच्या तंबाखूविरोधी पथकाने शहरात गस्त घातली असता शहरात छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात खर्रा विक्री होत असल्याची बाब उघडकीस आली. न. प. च्या पथकाने चार चहा विक्रेत्यांच्या टपरीची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. याप्रकरणी त्यांच्याकडून दोन हजारांचा दंड वसूल करून पुन्हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याची तंबी दिली.
कोरोना महामारीचे संकट टाळण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. शहरातील पानठेले बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. तरी शहरात सहजतेने खर्रा उपलब्ध होत आहे. सदर बाब लक्षात येताच शहरातील विविध ठिकाणातील विक्री होणाऱ्या दुकानांची झडती घेतली. यावेळी चहा विक्रेत्याकडे मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थ, खर्रा आढळून आला. संपूर्ण माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी त्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे, शासकीय इमारतीच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असून सुद्धा महिला व बाल रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्या जात आहे. या परिसरातील तीन दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रशासनाच्या मार्गदर्शनात ही कारवाई तंबाखूविरोधी पथकातील बबू शेख, भूपेंद्र मंदिरकर, मधुकर लटारे यांनी केली. यावेळी मुक्तिपथचे तालुका संघटक अमोल वाकुडकर, उपसंघटक रेवनाथ मेश्राम उपस्थित होते.

दारूबंदीची ओवाळणी
अहेरी : स्थानिक पोलीस ठाण्यात महिला संघटनेतर्फे ‘राखी विथ खाकी’ उपक्रम राबविण्यात आला. या अंतर्गत पोलिसांना राखी बांधून महिलांनी दारूबंदीची ओवाळणी मागितली. अहेरी शहर दारुमुक्त करण्यासाठी महिला संघटना वॉर्ड, मोहल्यातील समिती सदस्य परिश्रम घेत आहे. महिलांच्या पुढाकारातून व पोलिसांच्या सहकार्याने काही प्रमाणात अवैध दारू विक्रीवर अंकुश लावण्यात यश आले आहे. मात्र, अद्यापही काही ठिकाणी अवैध दारू विक्री सुरु आहे. त्यामुळे शहरातून दारू हद्दपार करा, अशी मागणी अहेरी शहरातील महिलांनी पोलिसांकडे राखी बांधून केली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे, एपीआय शिंदे, पीएसआय विनायक दळस पाटील यांच्यासह मुक्तिपथचे तालुका संघटक केशव चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Kharra sale of tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.