शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

बुधवार ठरला अपघातवार, एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:34 IST

गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी तालुक्यात बुधवारी वेगवेगळ्या ठिकाणी चार अपघात घडले. देसाईगंज शहरात घडलेल्या अपघातात एक ठार व एक इसम जखमी झाला. गडचिरोली तालुक्यातील येवली गावाजवळ झालेल्या अपघातात १३ पोलीस जवान जखमी झाले.

ठळक मुद्देदेसाईगंज येथे अपघातात एक जखमी : आरमोरी शहर व देऊळगावनजीक ट्रक उलटला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/देसाईगंज/आरमोरी : गडचिरोली, देसाईगंज व आरमोरी तालुक्यात बुधवारी वेगवेगळ्या ठिकाणी चार अपघात घडले. देसाईगंज शहरात घडलेल्या अपघातात एक ठार व एक इसम जखमी झाला. गडचिरोली तालुक्यातील येवली गावाजवळ झालेल्या अपघातात १३ पोलीस जवान जखमी झाले. आरमोरी शहरात ट्रकच्या धडकेने झाड कोसळले तर देऊळगावनजीक गिट्टी घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने या मार्गावरील वाहतूक काही तास बंद होती. एकूणच या घटनांमुळे बुधवार हा अपघातवार ठरला.देसाईगंज- अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एक जण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ८ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास देसार्ईगंज-लाखांदूर मार्गावरील बैद्यनाथ फॅक्टरी व कारमेल अ‍ॅकॅडमी दरम्यानच्या वळणावर घडली.स्वप्नील प्रदिप राऊत (२५) रा. ब्रम्हपुरी असे जागीच ठार झालेल्या युवकाचे नाव आहे तर सुरज युवराज नहामूर्ते (२०) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार स्वप्नील व सुरज एमएच-३५ एएस ६८०२ क्रमांकाच्या दुचाकीने लाखांदूर मार्गे देसाईगंजवरून सायंकाळच्या सुमारास ब्रम्हपुरीला जात होते. दरम्यान विरूद्ध दिशेने समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने स्वप्नील राऊत याचा जागीच मृत्यू झाला. तर सुरज नहामूर्ते गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती देसाईगंज पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक मांडवकर घटनास्थळी पोहोचले. जखमी सुरजला तत्काळ औषधोपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले. गंभीर जखमी सुरजचा एक पाय व हात पूर्णपणे तुटला. त्यामुळे त्याला नागपूरला रेफर करण्यात आले.मृतक स्वप्नीलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला. अपघात कसा व कोणत्या वाहनाने घडला, याची माहिती मिळू शकली नाही. अधिक तपास देसाईगंज पोलीस करीत आहेत.आरमोरी- येथील जुना बसस्थानक परिसरात कोंडा भरलेल्या ट्रकची धडक झाडाला बसल्याने झाड खाली कोसळले. पोलीस चौकीलगत एक मोठे झाड आहे. बाजारपेठेकडील राईसमिलमधून कोंडा भरलेल ट्रक मुख्य मार्गावरून येत होता. दरम्यान या ट्रकची झाडाला धडक बसली. त्यामुळे झाड पूर्णत: रस्त्यावर कोसळले. सदर झाड विद्युत तारांवर पडल्याने ये-जा करणाऱ्या लोकांची तारांबाळ उडाली. तुटलेले विद्युत तार बसस्थानकापुढे पडल्याने मोठी जीवितहानी टळली. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांमार्फत हे झाड बाजूला हटवून तुटलेले तार तोडण्याचे काम सुरू करण्यात आले.भूसुरुंगरोधक वाहन उलटूून १३ जवान जखमीगडचिरोली : नक्षलविरोधी अभियानावरून परत येत असताना पोलीस जवानांचे भू-सुरूंगरोधक वाहन चामोर्शी मार्गावरील येवली गावाजवळ उलटल्याने वाहनात बसलेले १३ जवान जखमी झाले. त्यापैकी ४ जवानांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. हा अपघात मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार, चामोर्शी मार्गाने वाहन जात असताना अचानक म्हशी समोर आल्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे वाहन उलटले असल्याचे सांगितले जाते. वाहनातील किरकोळ जखमी जवानांना जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. सध्या जवानांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे.ट्रक उलटल्याने वाहतूक ठप्पगडचिरोली-आरमोरी मार्गावरील देऊळगावजवळ बुधवारी सकाळी गिट्टी घेऊन जाणारा ट्रक रस्त्याच्या मधोमध उलटला. त्यामुळे या मार्गावरील संपूर्ण वाहतूक काही तास बंद होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती हाताळली. या ठिकाणी वाहनांची दोन्ही बाजूने रांग लागली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू