शहरं
Join us  
Trending Stories
1
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
2
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
3
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित
4
धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान
5
'फितना अल हिंदुस्तान' काय आहे? पाकिस्तानला फुटला घाम; भारताविरोधात केला खोटा दावा
6
रोड शोच खटकतो! लोकांचा जीव महत्त्वाचा; विजयाचे सेलिब्रेशन करायचे असेल तर... गंभीर स्पष्टच बोलला
7
राहुल गांधींच्या ‘आत्मसमर्पणा’बाबत केलेल्या वक्तव्यावर शशी थरुर यांची प्रतिक्रिया; म्हणाले...
8
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
9
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रानंतर युट्यूबर जसबीर सिंगला अटक, पोलिसांची मोठी कारवाई
10
आता कोणत्या देशावर रशिया हल्ला करणार?; १० हजार सैन्य तैनातीच्या दाव्यानं युरोपमध्ये खळबळ
11
Nashik Politics: संजय राऊत-सुधाकर बडगुजर यांच्यातील चॅटिंगचा स्क्रीनशॉट व्हायरल
12
Samruddhi Mahamarg: हा फक्त रस्ता नाही, तर राज्याच्या प्रगतीचा इकॉनॉमिक कॉरिडोर -CM देवेंद्र फडणवीस
13
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
14
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
15
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
16
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
17
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
18
डॉक्टर दाम्पत्य 12 दिवस डिजिटल अरेस्ट; CBI अधिकारी असल्याचे भासवून 2 कोटी रुपये लुटले
19
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
20
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

फवारणी कर्मचाऱ्यांना न्याय द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:01 IST

जिल्हाधिकारी व आ.डॉ.देवराव होळी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सन २०१४ ते २०१७ या कालावधीत दहावी नापास असलेल्या सर्व फवारणी कामगारांना आरटी वर्करचे आदेश देण्यात आले होते. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मात्र या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही.

ठळक मुद्देनिवेदन सादर : दहावी नापास फवारणी कामगारांची जिल्हाधिकारी व आमदारांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सन २०१९ या वर्षात दहावी नापास हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना आरटी वर्करचे आदेश देण्यात आले नाही. त्यामुळे अन्याय झाला. आता तरी फवारणीच्या कामावर या कर्मचाऱ्यांना घ्यावे, अशी मागणी फवारणी कामगार दहावी नापास संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात जिल्हाधिकारी व आ.डॉ.देवराव होळी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सन २०१४ ते २०१७ या कालावधीत दहावी नापास असलेल्या सर्व फवारणी कामगारांना आरटी वर्करचे आदेश देण्यात आले होते. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मात्र या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही. २०१९ या वर्षात इयत्ता दहावी उत्तीर्ण कामगारांना फवारणीच्या कामाचे आदेश देण्यात आले. तसेच आरटी वर्करचेही आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे दहावी नापास झालेल्या अनुभवी व जुन्या हंगामी फवारणी कामगारांवर अन्याय झाला. त्यामुळे आतातरी न्याय द्यावा, अशी मागणी दहावी नापास हंगामी फवारणी कर्मचाºयांनी केली आहे.निवेदनावर राजू सोमनकार, रामदास भोयर, रामदास भांडेकर, सुरेश सातपुते, माचिंद्र सुरजागडे, देविदास कुकडे, मोरेश्वर बारसागडे, जगदीश नैताम, नक्टू सातपुते, दिवाकर नैताम, गजानन कोठारे, पुरूषोत्तम गव्हारे, आनंदराव चापले, राजू टिकले आदींच्या स्वाक्षºया आहेत.- तर उपोषण करणार; आरोग्य विभागाला अल्टीमेटमदहावी नापास जुन्या अनुभवी हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांना चालू वर्षात कामाचे आदेश देण्यात आले नाही. त्यामुळे या कामगारांवर अन्याय झाला असून उपासमारीची पाळी आली आहे. यासंदर्भात संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी, सहसंचालक आरोग्य सेवा, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी आदींना निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत. या सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाºयांनी सदर प्रश्नाबाबत ठोस निर्णय घेऊन दहावी नापास फवारणी कामगारांना न्याय द्यावा, येत्या सात दिवसांत याबाबत कार्यवाही करावी, अन्यथा गडचिरोली येथे उपोषणाला बसणार, असा इशारा दहावी नापास फवारणी कामगारांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी अधिकारी व आमदाराशी निवेदन देताना चर्चाही केली.

टॅग्स :Socialसामाजिक