शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जीपचे भाडे चार हजार, दोन रुपये दराने बैलगाडीतून प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 15:49 IST

खर्चाची मर्यादा पाळा : निवडणूक विभागाने निश्चित केले वाहनांचे दर

दिगांबर जवादे लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार करणे आवश्यक आहे. प्रचारासाठी प्रामुख्याने विविध प्रकारच्या वाहनांचा उपयोग केला जातो. कोणत्या वाहनाचे दर दिवशीचे किती रूपये भाडे राहील, हे निवडणूक विभागाने निश्चित केले आहे. त्यानुसार टाटा सुमो, बोलोरो, काळी-पिवळी, जीप यांचे इंधनासह दिवसाचे भाडे ३ हजार ८०० रूपये तर बैलगाडी, घोडागाडीचा प्रति तास दर २ रूपये ठरविण्यात आला आहे. 

निवडणुकीदरम्यान मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवाराला प्रचार करावा लागतो. यासाठी वाहने भाड्याने घेऊन त्यावर ध्वनीक्षेपक लावला जाते. तसेच बॅनर, पोस्टर तसेच वाहनाला बॅनर, पोस्टर बांधून उमेदवार प्रचार करतात. निवडणुकीदरम्यान, खर्चाची मर्यादा पाळणे उमेदवाराला आवश्यक आहे. यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत ४० लाख रूपये खर्चाची मर्यादा देण्यात आली आहे. दर दिवशीचा खर्च उमेदवाराला निवडणूक विभागाकडे सादर करावा लागते. खर्चाची मर्यादा ओलांडल्यास तो उमेदवार निवडून येऊनही त्याचे पद धोक्यात येण्याची शक्यता असते.

कोणत्या वाहनासाठी किती रूपये दर राहणार आहे, हे ठरविण्याचा अधिकार निवडणूक विभागाला आहे. संबंधित उमेदवाराने त्या वाहनधारकाला किती रूपये दिले तरी निवडणूक विभागाकडे खर्च सादर करतेवेळी निवडणूक विभागाने ठरवून दिलेल्या दरानेच खर्च सादर करावा लागतो. त्यानुसार निवडणूक विभागाने वाहनांचे दर ठरवले आहेत. 

निवडणूक खर्चाचा हिशेब जुळवतेवेळी कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने जवळपास सर्वच प्रकारच्या वाहनांचे दर ठरवले आहेत. सोबतच इंधनासह व इंधनाशिवाय असेसुद्धा वर्गीकरण करण्यात आले आहे. त्यानुसारच निवडणूक खर्च विभागाला सादर करणे आवश्यक आहे. 

ऑटोरिक्षा १ हजार रूपये दिवसऑटोरिक्षाच्या माध्यमातूनही प्रचार केला जातो. निवडणूक विभागाने इंधनासह ऑटोरिक्षाचा दर प्रति दिवस १ हजार रूपये, सायकल रिक्षा प्रति तास २ रूपये, बैलगाडी, घोडागाडी, सायकल प्रति तास २ रूपये, दुचाकी प्रति तास २० रूपये, ट्रॉलिसोबत ट्रॅक्टर प्रति दिवस ३ हजार रूपये दर ठरविला आहे.

४० सिटर प्रवाशी वाहनाचे भाडे १० हजार रूपये ४० सिटर प्रवाशी वाहनाचे इंधनाशिवाय दिवसाचे भाडे ७ हजार ७०० रूपये तर इंधनासह १० हजार ४०० रूपये दर ठरवला आहे. १८ सिटर वाहनाचे दिवसाचे इंधनाशिवाय भाडे ४ हजार ६२५ तर इंधनासोबतचे भाडे ५ हजार ७६० रूपये ठरविले आहे. ५० सिटर वाहनाचे इंधनासोबतचे भाडे १२ हजार १५० रूपये ठरविण्यात आले आहेत.

मालवाहू वाहनासाठी पाच हजार रूपये मालवाहू हलक्या वाहनाचे इंधनासह भाडे ५ हजार २६० रूपये ठरविले आहे. १० चाकी वाहन असल्यास १२ हजार ८०० रूपये, १२ ते १४ चाकी वाहन १३ हजार ६०० रुपये, १६ चाकी वाहनाचे भाडे १५ हजार ७०० रूपये ठरविले आहे. त्यानुसार निवडणूक खर्च सादर करावा लागेल.

सायकल रिक्षा प्रति तास दोन रूपये कुठे मिळते सांगा साहेब ? काही उमेदवार शहरात सायकल रिक्षाच्या माध्यमातून प्रचार करतात. त्यासाठी इंधन लागत नाही. त्यामुळे भाडे कमीच राहिल. मात्र निवडणूक विभागाने सायकल रिक्षा, घोडागाडी, बैलगाडी, सायकल यासाठी प्रति तास केवळ दोन रूपये भाडे ठरविले आहे. ४०० रुपये दिवसाची मजुरी दिल्याशिवाय मजूर मिळत नाही, अशास्थितीत सायकल, सायकल रिक्षा, बैलगाडी केवळ दोन रूपये प्रति तास या दराने मिळणार काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Gadchiroliगडचिरोली