अबुझमाडमधील जहाल माओवाद्याचा आजाराने मृत्यू; कांकेर जंगलात सोडला मृतदेह

By संजय तिपाले | Published: March 16, 2024 01:55 PM2024-03-16T13:55:58+5:302024-03-16T13:56:34+5:30

कुटुंबीयांनी मूळ गावी केले अंत्यसंस्कार

Jahal Maoist dies of illness in Abuzmad; Body left in Kanker forest | अबुझमाडमधील जहाल माओवाद्याचा आजाराने मृत्यू; कांकेर जंगलात सोडला मृतदेह

अबुझमाडमधील जहाल माओवाद्याचा आजाराने मृत्यू; कांकेर जंगलात सोडला मृतदेह

गडचिरोली : छत्तीसगड व महाराष्ट्र सीमेवर माओवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुझमाड जंगलात अनेक देशविघातक कारवायांची व्यूहरचना आखणारा जहाल माओवादी मनोज उर्फ पप्पा उसेंडी (७२ वर्षे) याचा आजारपणाने १५ मार्च रोजी मृत्यू झाला. माओवाद्यांनी त्याचा मृतदेह कांकेर जंगलात सोडला, त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांच्या परवानगीने परसलगोंदी (ता.एटापल्ली) येेथे अंत्यसंस्कार केले.

मनोज उसेंडी हा वयाच्या १८ व्या वर्षीच माओवादी चळवळीत सामील झाला होता. छत्तीसगडच्या अबुझमाड जंगलात झालेल्या अनेक माओवादी कारवायांचा त्याचा प्रत्यक्ष सहभाग राहिलेला आहे. पोलिस चकमकीसह घातपाती कारवाया त्याच्या इशाऱ्यावर होत हाेत्या. त्याने माओवादी चळवळीत विविध पदांवर काम केले होते. दरम्यान, वयोमानानुसार तो थकला होता. १५ मार्च रोजी त्याचे आजारपणाने निधन झाले. त्यानंतर माओवाद्यांनी त्याचा मृतदेह कांकेर जंगलात सोडला. कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांची परवानगी घेऊन मृतदेह परसलगोंदी येथे आणला. त्याच्यावर १६ मार्च रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.  

गडचिरोलीतील कारवायांत सहभाग नाही 
दरम्यान, मनोज उसेंडी याचा माओवादी चळवळीतील सर्वाधिक कार्यकाळ हा अबुझमाड येथे गेला. छत्तीसगडमधील अनेक माओवादी कारवायांची व्यूहरचना आखण्यात त्याचा महत्त्वाचा 'रोल' होता. मात्र, गडचिरोली जिल्ह्यातील कारवायांत त्याचा सहभाग आढळून आलेला नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी 'लोकमत'ला दिली.

Web Title: Jahal Maoist dies of illness in Abuzmad; Body left in Kanker forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.