शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाणे व पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचे अमित शाह यांनी दिले संकेत
2
आजचे राशीभविष्य: बुधवार 28 मे 2025; या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मिश्र फलदायी, वैवाहिक जीवनात सुख, समाधान प्राप्त होईल
3
नालेसफाई की महापालिकेच्या तिजोरीची सफाई? पालिका अधिकारी घरी, त्यांचे मोबाइल स्पॉटवर
4
राजेंद्र हगवणेला मदत करणाऱ्या चोंधेवर गुन्हा दाखल; सुयश चोंधेच्या पत्नीची बावधन पोलिसांकडे तक्रार
5
मेट्राे स्थानक २ दिवसांत सुरू करणार; ‘एमएमआरसी’च्या अश्विनी भिडे यांची माहिती
6
महामुंबईतील वाहने बीजिंग, शांघाय, टोकियोपेक्षा जास्त; पार्किंग असेल, तरच वाहन खरेदीस मुभा
7
पंत म्हणाला; अशी Run Out ची विकेट नकोच! मग Jitesh Sharma नं गळाभेट घेत मानले आभार (VIDEO)
8
मुंबईचे मारेकरी; काळजी घ्यावी वाटत नाही हेच शहराचे मोठं दुर्दैव
9
अ‘जून’ भरपूर... पुढील जून महिन्यातही देशात सरासरीपेक्षा अधिक कोसळधारा
10
विद्यार्थिनीला गुन्हेगार बनवायचे आहे का? वादग्रस्त पोस्टप्रकरणी हायकोर्टाकडून जामीन
11
"पुतिन आगीसोबत खेळत आहेत,जर मी तिथे नसतो तर..." , रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यावर ट्रम्प संतापले
12
LSG vs RCB : दिग्वेश राठीचा हिशोब चुकला! जितेश शर्मानं असा घेतला बदला (VIDEO)
13
जितेश शर्माची पहिली IPL फिफ्टी; विक्रमी विजयासह RCB नं साधला Qualifier 1 खेळण्याचा डाव
14
IPL 2025 Playoffs Schedule : हार्दिकला 'एक्स' भेटणार! पंजाब-बंगळुरु थेट फायनल गाठण्यासाठी भिडणार
15
'व्हायरल व्हिडीओ बनावट,मी गाडीत नव्हतो'; महामार्गावर कांड करणाऱ्या नेत्याने काय सांगितले?
16
संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरी धाड, ५० लाखांचं सोनं, मोठं घबाड सापडलं
17
'दहशतवादी पुन्हा त्यांच्या अड्ड्यांवर येताहेत'; BSF ने सीमेवर घुसखोरी होण्याचा दिला इशारा
18
दिवसभर लोळावंसं वाटणं तुमच्यासाठी घातक, तो आहे एक आजार; काय आहेत लक्षणे?
19
चेज मास्टर कोहलीनं अर्धशतकासह मोडला वॉर्नरचा विक्रम; मग अनुष्काची खास झलकही दिसली (VIDEO)
20
२९ पैकी १५ जखमा ताज्या; मारहाण करून वैष्णवीची हत्या केली, कसून चौकशी करा, कस्पटेंची मागणी

क्रीडा पुरस्कारासाठी मागविले अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:25 IST

क्रीडापटू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांचेकडून जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी १० जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. पुरस्काराकरिता खेळाडूंनी ...

क्रीडापटू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांचेकडून जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी १० जानेवारी २०२१ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. पुरस्काराकरिता खेळाडूंनी राज्य, राष्ट्रीय, वरिष्ठ व कनिष्ठ, अजिंक्य पद स्पर्धेत तसेच शालेय, ग्रामीण व महिला स्पर्धेत विशेष कामगिरी केलेली असावी. पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे महाराष्ट्रात सलग १५ वर्षे वास्तव्य असले पाहिजे. क्रीडा मार्गदर्शकांनी गडचिरोली जिल्ह्यातील गत १० वर्षात मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारातील वरिष्ठ, कनिष्ठ गटाच्या अधिकृत राज्य व राष्ट्रीय स्पर्धा तसेच शालेय, ग्रामीण व महिला राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू तयार केलेले असावेत. अर्ज करतेवेळी वय ३५ वर्षे पूर्ण असावे. पुरस्काराकरिता १ जुलै ते ३० जून या कालावधीतील कामगिरी विचारात घेतली जाईल. अश्वाराेहण, ॲथलेटिक्स, कॅरम, कुस्ती, गोल्फ, जलतरण, तलवारबाजी, तायक्वांडो, जिम्नॅस्टिक, ज्युदो, धनुर्विद्या, नेमबाजी, टेनिस, टेबल- टेनिस, ट्रायथलॉन, पाॅवरलिफ्टिंग, बुद्धिबळ, बॅडमिंटन, मुष्टियुद्ध, वेटलिफ्टिंग, मल्लखांब, वूशू, शरीरसौष्ठव, सायकलिंग, बिलियर्ड ॲन्ड स्नूकर, स्केटिंग, स्वॅश, आट्यापाट्या, कबड्डी, खो-खो, कयाकिंग/कॅनोईंग, क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, याटिंग, रोईंग, हॅन्डबॉल, हॉकी, व्हॉलिबॉल, साॅफ्टबॉल, रग्बी, मॉडर्न पेंटाथलॉन, बेसबॉल व स्पोर्टस्‌ क्लाईबिंग याच खेळातील कामगिरी विचारात घेतली जाईल. इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठाेड यांनी केले आहे.