शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

१८ आयएएस प्रशिक्षणार्थ्यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 6:00 AM

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याच्या माध्यमातून अधिकाºयांचे स्वागत केले. गावकºयांशी संवाद साधून संस्कृती, शेती, शेती व्यवसाय, उत्पादन, हवामान, आरोग्य विषयी जाणून घेतले. आदिवासी प्रकल्प अधिकारी मनूज जिंदाल हे प्रशिक्षार्थी अधिकाºयांसोबत कोयनगुडा येथे गेले होते. तेथील विद्यार्थ्यांशी चर्चा केली. कोयनगुडा येथील नागरिकांनी श्रमदानातून जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण केले.

ठळक मुद्देभामरागड तालुक्याला भेट : आदिवासी संस्कृती, प्रथा, परंपरांची जाणली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : १८ आयएसएस प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी भामरागड तालुक्याला भेट देऊन या तालुक्यातील आदिवासी संस्कृती, समस्या जाणून घेतल्या. तसेच विविध विभागांना भेटी देऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली.प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देऊन ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे यांच्यासोबत चर्चा केली. आदिवासी संस्कृती व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी या अधिकाºयांनी कोयनगुडा या आदिवासी गावाला भेट दिली. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याच्या माध्यमातून अधिकाºयांचे स्वागत केले. गावकºयांशी संवाद साधून संस्कृती, शेती, शेती व्यवसाय, उत्पादन, हवामान, आरोग्य विषयी जाणून घेतले. आदिवासी प्रकल्प अधिकारी मनूज जिंदाल हे प्रशिक्षार्थी अधिकाºयांसोबत कोयनगुडा येथे गेले होते. तेथील विद्यार्थ्यांशी चर्चा केली. कोयनगुडा येथील नागरिकांनी श्रमदानातून जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण केले. महिनाभर श्रमदान करून शाळेची डागडुजी करण्यात आली. प्रशिक्षणार्थ्यांनी विविध स्थळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी मनूज जिंदाल, तहसीलदार कैलास अंडील, एसडीपीओ डॉ.कुणाल सोनवाने, बीडीओ स्वप्नील मगदूम हजर होते.देवराई आर्ट व्हिलेज प्रशिक्षण केंद्राला भेटआदिवासी संस्कृतीवर आधारित बांबू, लाकूड व इतर धातू यांच्यापासून तयार करण्यात आलेल्या भामरागड येथील आकर्षिक वास्तू देवरायी आर्ट व्हिलेज प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. या प्रशिक्षण केंद्रात आदिवासींच्या संस्कृतीशी संबंधित अनेक वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व वस्तूंची पाहणी केल्यानंतर प्रशिक्षणार्थी अधिकाºयांनी प्रशंसा केली.भामरागड हा जिल्ह्यातील सर्वात दुर्गम, घनदाट जंगलाने व्यापलेला तालुका आहे. या तालुक्यातील बहुतांश गावांमधील आदिवासी अजूनही पारंपरिक पद्धतीनेच आपले दैनंदिन व्यवहार पार पाडतात. येथील गरीबी व आदिवासी संस्कृती प्रशिक्षणार्थी अधिकाºयांसाठी संशोधनाचा विषय ठरू शकते.