शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

राष्ट्रपतींच्या दौऱ्याला गुप्तचर यंत्रणेचा ग्रीन सिग्नल, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे सुरक्षाकवच

By संजय तिपाले | Updated: June 27, 2023 14:07 IST

जय्यत तयारी : मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री, राज्यपालही येणार

गडचिरोली : राज्याच्या शेवटच्या टोकावरील, मागास, आदिवासीबहुल व नक्षलप्रभावित गडचिरोलीत ५ जुलै रोजी गोंडवाना विद्यापीठातील दहाव्या दीक्षांत समारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येणार आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांसह अर्धा डझन मंत्री उपस्थिती लावणार आहेत. दरम्यान, गुप्तचर यंत्रणनेने राष्ट्रपतींच्या दौऱ्यास हिरवी झेंडी दाखवली असून सुरक्षेच्या दृष्टीने उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांचे सुरक्षाकवच तैनात केले जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

शहरातील गोंडवाना विद्यापीठात ५ जुलैला सकाळी साडेदहा वाजता इमारत भूमिपूजन व दीक्षांत समारंभ मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या उपस्थितीत राहणार आहेत. जिल्हा निर्मितीनंतर पहिल्यांदाच राष्ट्रपती गडचिरोलीत येत आहेत. आदिवासी समूहातून आलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासीबहुल जिल्ह्यात येत असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. 

राज्यपाल रमेश बैस हे अध्यक्षस्थानी राहतील.  यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री  व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे उपस्थित राहणार आहेत. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. प्रशांत बोकारे व प्रभारी कुलगुरु  डॉ. श्रीराम कावळे यांची  उपस्थिती राहणार आहे. यावेळी  विशेष गुणवत्ता प्राप्त व प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी व विद्यार्थीनींना सुवर्ण पदक, आचार्य पदवी व पदवी प्रदान करण्यात येणार आहे.

पाचशेवर पोलिसांचा फौजफाटा 

दरम्यान, या दौऱ्यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे. तीन अपर पोलिस अधीक्षक, पाच उपअधीक्षक, दहा पोलिस निरीक्षक, १५ सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक, ५०० अंमलदार, विशेष कृती दल (सी- ६०) च्या पाच तुकड्या व राज्य राखीव दलाची तुकडी असा फौजफाटा तैनात केला जाणार आहे.दाैऱ्यावर पावसाचे सावट?

राष्ट्रपतींच्या दौऱ्यात सुरक्षेचा प्रश्न नाही, पण पावसाचे सावट आहे. द्रौपदी मुर्मू या हवाईसफर करुनच गडचिरोलीत येणार आहेत. दिल्लीहून हैद्राबाद व तेथून गडचिरोलीला त्या हेलिकॉप्टरमधून येणार आहेत. जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. शिवाय हैद्राबाद ते गडचिरोली अंतरही दूर आहे. त्यामुळे खराब वातावरणाचा दौऱ्यास अडसर तर ठरणार नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.

राष्ट्रपतींच्या नियोजित दौऱ्यासाठी पोलिस यंत्रण सज्ज आहे. सुरक्षा व्यवस्थेत कोठेही कमतरता राहणार नाही, यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. हेलिपॅडपासून ते कार्यक्रमस्थळापर्यंत चोख बंदोबस्त तैनात केला जाईल.

- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक गडचिरोली

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मूuniversityविद्यापीठGadchiroliगडचिरोली