किन्हाळा व अरततोंडी हे गाव पुनर्वसित होण्यापूर्वी मोहटोला, किन्हाळा, डोंगरगाव, रिठ चिखली, विहीरगाव ह्या गावाचा बैलबंडी व पादचारी मार्ग हा कोकडी गावावरुन गाढवी नदी पार करुन देसाईगंज याठिकाणी यावे लागत असे. कोकडी याठिकाणी पोहाेचण्यासाठी एक नाला व नदी पार करुन जावे लागत असे. त्यामुळे मार्गाची ही अडचण लक्षात घेता ३० वर्षांपूर्वी किन्हाळा व फरी या दरम्यान पुलाची निर्मिती झाली. यामुळे हा मार्ग सरळ होऊन कुरखेडापासून देसाईगंज हा कमी अंतराचा सरळ मार्ग तयार झाला त्यामुळे हा मार्ग अत्यंत वर्दळीचा झालेला आहे. परंतु या रहदारीच्या पुलावर मात्र लोखंडी खांब लावण्याची सोय केली आहे. मात्र आजतागायत ह्या ठिकाणी संरक्षित खांब लागलेले नाही. पूल कामाच्या अंदाजपत्रकात या संरक्षित कठडे, नदीचे नाव, पुलिया निर्मिती दिनांक व अंदाजे कामावर खर्च झालेला निधी हे लिहिण्यासाठी व्यवस्था केलेली आहे मात्र ते लिहिल्याच गेलेले नाही. तसेच तालुक्यातील सर्वात कमी उंचीचा पूल असून येथे नेहमीच पुराचे पाणी असते त्यामुळे संरक्षणार्थ ह्या कठड्यांची नितांत गरज असताना तत्कालीन कंत्राटदारांनी ह्या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
120721\40174045img_20201214_172733.jpg
किन्हाळा फरी यांचेदरम्यातुन वाहणाऱ्या गाढवी नदीपुलियावर सरंक्षित कठडे नाहीत.लावण्याची मागणी.