शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

गडचिरोली, वर्धा जिल्ह्यांत केंद्रीय पथकाकडून पीक नुकसानीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2022 20:57 IST

Gadchiroli News जुलै महिन्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. केंद्रीय पथकांनी मंगळवारी या दोन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी पाहणी केली.

ठळक मुद्दे सिंराेचाला पोहोचण्यासाठी हेलिकाॅप्टरचा वापरशेतकऱ्यांशी साधला संवाद

गडचिरोली/ वर्धा : जुलै महिन्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. केंद्रीय पथकांनी मंगळवारी या दोन जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी पाहणी केली. केंद्रीय पथकातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्धा जिल्ह्याच्या चार तालुक्यांतील दहा गावांत जाऊन केली. यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागांच्या पाहणीसह शेतकरी, नुकसानग्रस्त व अधिकाऱ्यांशी संवाद साधून नुकसानीबाबतची अधिकचीही माहिती जाणून घेतली.

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात गोदावरी, प्राणहिता आणि इंद्रावती नदीच्या पुरामुळे बसलेल्या फटक्यानंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक मंगळवारी गडचिरोलीत दाखल झाले. तीन अधिकाऱ्यांच्या या पथकाने हेलिकॉप्टरने सिरोंचा येथे जाऊन काही शेतात पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.

या पथकात अर्थ मंत्रालयाचे उपसचिव रूपकदास तालुकदार, कृषी विभागाचे संचालक ए. एल. वाघमारे, रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर यांचा समावेश आहे. पुरादरम्यान १० हजारांहून अधिक नागरिकांना स्थलांतरित करावे लागले होते. शेती, घरे, रस्ते व जनावरे यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करून आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाने सिरोंचा तालुक्यातील आरडा, मुगापूर व मृदुकृष्णापूर या गावांना भेट दिली. तसेच सिरोंचा ते कालेश्वरम या राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली. या मार्गावरील गोदावरी नदीवर असलेल्या पुलाची एक कडा पुरात वाहून गेली होती.

यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील, अहेरीचे उपविभागीय दंडाधिकारी श्री अंकित, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज मास्तोळी, तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी आणि तालुका प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.

पूरबाधित नागरिकांशी साधला संवाद

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सिरोंचा तालुक्यातील नुकसानीबाबत पथकातील सदस्यांना माहिती दिली. यावेळी पथकातील सदस्यांनी गावातील उपस्थित शेतकरी व नागरिक यांच्याशी झालेल्या नुकसानीबाबत चर्चा केली. उपस्थित शेतकऱ्यांनी पथकातील सदस्यांना शेतीसह झालेल्या जनावरांच्या हानीबाबत माहिती दिली. शेताच्या बांधावर जाऊनही पथकातील सदस्यांनी पाहणी केली. याबाबतचा अहवाल केंद्राकडे सादर करून आवश्यक ती प्रक्रिया तातडीने करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

बोरगावच्या शेतकऱ्याने साधला इंग्रजी, हिंदी अन् मराठीत संवाद

विशेष म्हणजे देवळी तालुक्यातील बोरगाव येथील शेतकरी प्रशांत निमसडकर यांनी एखाद्या शासकीय किंवा निमशासकीय अधिकाऱ्याप्रमाणेच सुरुवातीला इंग्रजी, नंतर हिंदी, तर नंतर मराठी भाषेत केंद्रीय पथकातील बड्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून अतिवृष्टीमुळे ओढावलेली पूरस्थिती व नुकसानीची माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्रालयाचे सहसचिव राजीव शर्मा यांच्या नेतृत्वातील पथकात जलशक्ती मंत्रालयाचे संचालक गिरीश उंबरजे, ग्रामविकास मंत्रालयाचे संचालक डॉ. माणिकचंद्र पंडित, ऊर्जा मंत्रालयाच्या सहायक संचालक मीना हुड्डा यांचा समावेश होता.

पथकासोबत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर, वर्धा येथील उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, हिंगणघाट येथील उपविभागीय महसूल अधिकारी शिल्पा सोनाले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे यांच्यासह सेलू, वर्धा, देवळी, हिंगणघाट तसेच समुद्रपूरचे तहसीलदार आदींची उपस्थिती होती. हिंगणघाट येथील विश्रामगृहात भाजपचे आमदार समीर कुणावार यांनी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत चर्चा केली.

 

 

टॅग्स :agricultureशेती